Generic medicine information in 2024

Generic medicine vrs branded medicine – (जेनेरिक औषधे विरुद्ध ब्रँडेड औषधे)

आपण सर्वांनीच जेनेरिक औषधे आणि ब्रांडेड औषधे याविषयी ऐकले असेलच. ब्रँडेड औषधे थोडी महाग असतात आणि जनरिक औषधे बऱ्यापैकी स्वस्त असतात. (Generic medicine information in 2024) याचा अर्थ जेनेरिक औषधे आजार लवकर बरा करत नाहीत असा होतो का?  ब्रँडेड औषधे खूप महाग का असतात? जेनेरिक औषधे आणि ब्रॅण्डेड औषधे यामध्ये नेमका काय फरक असतो? यासंबंधीची सर्व माहिती या लेखामध्ये आपण घेऊयात. 

Example of generic medicine, branded medicine

 तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊयात की एखादी कंपनी औषधी कशी बनवते. कोणतेही नवीन औषध बनवण्यासाठी कंपनीला खूप रिसर्च करावा लागतो. एखाद्या आजाराला बऱ्या करणाऱ्या घटकाला इंग्रजीमध्ये API (ॲक्टिव्ह फार्मासिटिकल इन्ग्रेडियंट) असे संबोधले जाते. त्याला मराठीत आपण सक्रिय घटक  असे म्हणू शकतो. हा सक्रिय फार्मा घटकच आजार बरा करण्यासाठी कारणीभूत असतो. मग असे सक्रिय फार्मा घटक तयार http://Generic medicine information in 2024 करण्यासाठी अनेक कंपन्या मेहनत घेत असतात. ज्यावेळी एखादी कंपनी असा सक्रिय फार्मा घटक तयार करते त्यावेळी त्या घटकाचे पेटंट ती कंपनी घेते. हे पेटंट साधारणता वीस वर्षासाठी असते. या वीस वर्षाच्या कालावधीत फक्त तीच कंपनी या फार्मा घटकाचे उत्पादन करून त्याचे औषध बनवून, बाजारात विक्रीस  आणते.  व अशी औषधे विकून ती कंपनी नफा कमवते. म्हणजेच त्या कंपनीचे ते ब्रँडेड औषध बनते. पण ज्यावेळी वीस वर्षाचा कालावधी पूर्ण होतो त्यानंतर बाकी कंपनी ते औषध बनवू शकतात व बाजारात विकूही शकतात. या  इतर कंपन्यांनी बनवलेल्या औषधाला आपण जेनेरिक औषधे म्हणतो. उदाहरण द्यायचे झाले तर, सर्दी आणि तापावर वापरण्यात येणारी क्रोसिन (Crocin) ही टॅबलेट तुम्हाला माहिती असेलच. या टॅबलेट मधील पॅरासिटॅमॉल या सक्रिय घटकामुळे सर्दी व ताप बरा होतो. पण बाजारात पॅरासिटॅमॉल या नावाने सुद्धा टॅबलेट उपलब्ध आहेत. क्रोसिन टॅबलेट ही महाग आहे  याउलट  पॅरासिटॅमॉल ही टॅबलेट स्वस्त मिळते. या केस मध्ये क्रोसिन ही ब्रांडेड तर पॅरासिटॅमॉल ही जेनेरिक टॅबलेट आहे. दोन्ही टॅबलेट मध्ये आपल्याला सारखाच रिझल्ट मिळेल.

Why are generic drugs cheaper and branded drugs more expensive? जेनेरीक औषधे स्वस्त आणि ब्रांडेड औषधे महाग का असतात?

ज्यावेळी कंपनी API (ॲक्टिव फार्मासिटिकल इन्ग्रेडियंट) तयार करायला घेते त्यावेळी त्यांना खूप रिसर्च करावा लागतो. अनेक  लॅब टेस्ट करावे लागतात.परिणामी याचा खर्च खूप जास्त असतो.  पण ज्यावेळी ते यामध्ये यशस्वी होतात त्या API चे पेटंट घेतात व त्यापासून औषध बनवून बाजारात विकतात. हे सर्व सुरुवातीपासून करण्यासाठी झालेला अवाढव्य खर्च ते या उत्पादनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ब्रांडेड औषधे थोडी महाग असतात. याउलट, पेटंट शीथील झाल्यावर  इतर कंपन्या पेटंट कंपनीला रॉयल्टी देऊन औषधे निर्माण करतात. यासाठी त्यांना वेगळा रिसर्च करावा लागत नाही.  त्यामुळे त्यांना औषधे बनवण्यासाठी लागणारा खर्च खूपच कमी असतो परिणामी ती स्वस्त किमतीत मिळतात. पण ज्यावेळी रॉयल्टी हक्क दिला जातो, त्यावेळी काही करार करण्यात येतात. जसं की  टॅबलेट चा आकार,  रंग,  चव  यामध्ये फरक करावा लागतो. त्या औषधाचे नाव सुद्धा चेंज करावे लागते. तो ब्रॅण्डेड मेडिसिन सारखा करता येत नाही. Fort in Kolhapur Kille samangad in 2024- (सामानगड )

Now let us know whether generic drugs are as effective as branded drugs? (आता आपण जाणून घेऊयात जेनेरिक औषधे हे ब्रॅण्डेड औषधासारखीच उपायकारक असतात का?)

Generic medicine information, Generic medicine

थोडक्यात सांगायचे झाले तर त्याचे उत्तर हो असेच येईल.जेनेरिक औषधे सुद्धा ब्रँडेड औषधासारखीच फायदेशीर असतात.जेनेरिक औषधे ही फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन  म्हणजेच (FDA) द्वारे अनेक टेस्ट करून मंजूर केलेली असतात. त्यामुळे जेनेरिक औषधे सुद्धा पूर्णपणे सुरक्षित असतात. अमेरिका सारख्या देशात दहापैकी नऊ पेशंट हे जनरिक औषधे घेतात. डॉक्टर ज्यावेळी आपल्याला औषधे लिहून देतात त्यावेळी सहसा ब्रँडेड औषधांचे नाव लिहिलेले असते  पण ज्यावेळी त्यांना जनरिक औषध लिहून द्यायचे असते तेव्हा ते API नाव लिहितात. जागतिक आरोग्य संघटनेने (World health organization) असा दावा केला आहे की,  जर डॉक्टरांनी ब्रॅण्डेड औषधाच्या ऐवजी जेनेरिक औषधे घ्यायचा सल्ला दिला तर अमेरिका सारख्या विकसित देशात व भारतासारख्या विकसनशील देशात औषधांचा खर्च ७०% पेक्षा कमी येईल.

Generic Medicines and India’s Contribution (जेनेरिक औषधे आणि भारताचे योगदान)

जगभरात असलेल्या जनरिक औषधांच्या च्या मागणी पैकी 50 टक्के पुरवठा हा भारतातून होतो. भारतामध्ये एकूण साठ हजार पेक्षा जास्त जनरिक औषधांचा स्त्रोत आहे. भारत हा जगातील जनरिक औषधांचा पुरवठा करणारा मोठा देश आहे. अमेरिकेत जवळपास 60 टक्के पेक्षा जास्त भारतीय जनरिक औषधांची  मागणी आहे तसेच युनायटेड किंगडम मध्ये हा आकडा 25% वर येतो.

Why doctors do not prescribe generic drugs to patients? (डॉक्टर पेशंटला जनरिक औषधे का लिहून देत नाहीत?)

आता तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडला असेल की डॉक्टर जनरिक औषधांना इतके महत्त्व का देत नाहीत. आपण यामागचे कारण सुद्धा जाणून घेऊयात. ब्रँडेड औषधे विकणारी कंपनी त्या औषधाच्या प्रमोशनवर खूपच जास्त खर्च करते. यासाठी त्यांची स्वतंत्र सेल्स टीम कार्यरत असते. अशा टीम्स डॉक्टरांना त्यांचीऔषधे लिहून देण्यासाठी खूप सारी प्रलोभने दाखवतात.  त्यांना वस्तू स्वरूपात गिफ्ट देतात. त्यामुळे डॉक्टरांचा फायदा होतो. त्याचसोबत मेडिकल आणि डॉक्टर्स त्यांचे परस्पराशी  सहकार्याचे सबंध असतात. या उलट जेनेरिक औषधांचा कोणताही प्रमोशन खर्च नसतो. ती औषधे डॉक्टरांना विना मोबदला लिहून द्यायची असतात. त्यामुळे सामान्यपणे डॉक्टर्स ब्रँडेड औषधे लिहून देतात. भारतातील 65 टक्के लोक ब्रँडेडऔषधे विकत घेऊ शकत नाही.परिणामी त्यांचे आजारपण बळावते. त्यामुळे जेनेरिक औषधाविषयी सामान्य लोकांमध्ये जागृती निर्माण करायला हवी.

For your information (तुमच्या माहितीसाठी थोडेसे)

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी अर्जुन देशपांडे या युवकाने जेनेरिक आधार नावाची कंपनी सुरू केली. या कंपनीमध्ये जेनेरिक औषधे ही थेट उत्पादकाकडून घेऊन ती औषधे किरकोळ विक्रेत्यांना विकतात. त्यामुळे मधले कमिशन कमी होऊन औषधांच्या किमती कमी होण्यास मदत होते. हे स्टार्टअप इतके उपयुक्त  होते की यामध्ये  भारतरत्न रतन जी टाटा यांनी गुंतवणूक केली होती. अर्जुन देशपांडे यांच्या म्हणण्यानुसार आता असलेला त्यांचा सहा करोडचा रिव्हेन्यू पुढील दोन ते तीन वर्षात दीडशे ते दोनशे करोड पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. औषध निर्मितीच्या बाबतीत भारत हा जगातील तिसरा मोठा देश आहे.  जगामध्ये 50% औषधांचा पुरवठा करणारा भारत हा एकमेव देश आहे.  भारतीय अर्थव्यवस्था सर्वेक्षण 2021 नुसार पुढील दहा वर्षात भारतातील डोमेस्टिक मार्केट हे तीन ते चार पटींनी Uses of millets (तृणधान्ये कशी वापरावीत)वाढण्याची शक्यता आहे. भारतातील अंतर्गत मार्केटचा विचार केला असता चार लाख करोड रुपयांची अर्थव्यवस्था निर्माण होते.  यामध्ये जवळपास 70 टक्के जेनेरिक औषधांचा चा वाटा आहे.

थोडक्यात सांगायचे झाल्यास जनरिक औषधे ही ब्रँडेड औषधासारखीच परिणामकारक आणि सुरक्षित असतात. जेनेरिक औषधांची किंमत कमी असल्याकारणाने आपण त्यांचा वापर करण्यास हरकत नाही.  पुरेशा ज्ञानाभावी आपण जेनेरिक औषधांचा उपयोग करणे टाळतो. काही लोकांच्या मनात शंका असते की जेनेरिक औषधे ही व्यवस्थित बनवली जात नाहीत किंवा ज्या औषधांना मागणी नसते अशी औषधे म्हणजे जेनेरिक औषधे. पण यामध्ये काहीच तथ्य नाही. लोकांनी हा गैरसमज काढून टाकला पाहिजे. आपल्या सर्वसामान्य लोकांना परवडणारी औषधे ही जेनेरिकच आहेत. काही थोड्या डॉक्टर लोकांनी पेशंट्स ना जेनेरिक औषधे लिहून द्यायला हवीत. त्यामुळे लोकांमध्ये जागृती निर्माण होईल आणि जेनेरिक औषधाकडे  लोकांचा कल वाढेल.