सध्या ऑस्ट्रेलिया मध्ये सुरू असलेल्या इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्या कसोटी क्रिकेट सामन्यांच्याकडे सर्वांचे लक्ष आहे, पण त्याच सोबतच भारतात देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेचा हंगाम सुद्धा बहरात आलेला आहे. सध्या भारतामध्ये सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा त्याच्या अंतिम टप्प्यात आली आहे. कालच उपांत्यपूर्व फेरीचे सामने संपलेले असून उपांत्य फेरीच्या चार टीम भेटलेल्या आहेत. तत्पूर्वी उप उपांत्य फेरीमध्ये मुंबईने विदर्भाचा, दिल्लीने उत्तर (SMAT 2024-25) प्रदेशचा ,बडोदाने बंगालचा तर मध्यप्रदेश ने सौराष्ट्र चा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.उपांत्य फेरीत मुंबई विरुद्ध बडोदा तसेच दिल्ली विरुद्ध मध्य प्रदेश अशा प्रमुख लढती होतील. SMAT 2024-25
Smat 2024-25, मुंबई उपांत्य फेरीत
Domestic Cricket in India
Sayyad mushtak Ali trophy
आलूर येथे खेळवण्यात आलेल्या चौथ्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईकर अजिंक्य रहाणे च्या 84 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईने विदर्भाचा सहा गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना विदर्भ संघाने मुंबई समोर 222 धावांचे कठीण आव्हान ठेवले होते. विदर्भाकडून सलामीवीर अथर्व तायडे याने 41 चेंडूत 66धावांची खेळी केली. तर मध्य फळीतील फलंदाज वानखेडे यांने 33 चेंडूत 51 धावा जोडल्या. शेवटी शेवटी शुभम दुबे ने 43 धावांची वादळी खेळी केली. यामध्ये त्यांनी तीन चौकार व तीन षटकार लावले. मुंबईकडून अंकोलेकर हा सर्वात चांगला गोलंदाज ठरला. त्याने चार षटकामध्ये 32 धावा देत दोन बळी घेतले. उत्तरा दाखल खेळताना मुंबईचे सलामीवीर अजिंक्य रहाणे व पृथ्वी शॉ यांनी सुरुवातीलाच चांगली भागीदारी केली. त्यांनी सुरुवातीच्या सातच षटकामध्ये 83 धावांची सलामी दिली. पृथ्वी शॉ त्याच्या वैयक्तिक 49 धावसंख्येवर बाद झाल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे भरवशाचे फलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. एक बाजू लावून धरलेला अजिंक्य रहाणे 45 चेंडू 84 धावा करून बाद झाल्यानंतर मुंबईच्या संघावर थोडे दडपण आले. पण शिवम दुबे आणि सूर्यांश शेडगे यांनी दडपण झूगारून खेळ करत मुंबईला विजयापर्यंत पोहोचवले. शिवम ने 22 चेंडू खेळून 37 धावा केल्या तर सूर्यांशने बारा चेंडूतच 36 धावांची वादळी खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने चार षटकार लगावले. विदर्भा कडून एकाही गोलंदाजाला उत्तम कामगिरी करता आली नाही. 84 धावांच्या खेळीसाठी अजिंक्य रहाणे ला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. उपांत्य फेरीत मुंबईची लढत बडोदा संघासोबत होईल. Top 9 places to visit in Goa, beyond beaches.
दिल्लीचा उत्तर प्रदेश वर 19 धावांनी विजय:
बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर ठेवण्यात आलेल्या दुसऱ्या उप उपांत्य फेरीच्या सामन्यात अनुज रावत च्या दमदार खेळीच्या जोरावर दिल्ली उत्तर प्रदेश वर भारी ठरली. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने प्रियांश आर्या 44, यश तुमच्या 42 आणि अनुज रावत 73 धावांच्या जोरावर 193 धावांचे लक्ष ठेवले .अनुज रावतने आपल्या खेळ दरम्यान सात चौकार चार षटकार ठोकले. (SMAT 2024-25) प्रत्युत्तर दाखल खेळताना प्रियम गर्ग वगळता एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी उत्तर प्रदेशचा सांग 20 ओवर्स मध्ये सर्व बाद 173 धावाच करू शकला. दिल्लीकडून प्रिन्स यादवने तीन गडी बाद केले, त्याला कर्णधार आयुष बदोनी व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी दोन दोन गडी बाद करत त्याला चांगली साथ दिली. अनुज रावतला त्याच्या विस्फोटक खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
व्यंकटेश अय्यर ची अष्टपैलू खेळी, मध्यप्रदेशचा सौराष्ट्रावर विजय:
Smat 2024-25, ajinkya rahane, BCCI
आलूर येथे खेळण्यात आलेल्या मध्यप्रदेश व सौराष्ट्र यांच्या सामन्यामध्ये मध्य प्रदेशने विजय मिळवून प्रदिर्ग कालावधीने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळतात. नाणेफेक जिंकून मध्यप्रदेश ने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सौराष्ट्राकडून चिराग जानी याने नाबाद 80 धावांची खेळी केली. बाकी फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. मध्यप्रदेश कडून आयपीएल मधील महागडा खेळाडू ठरलेल्या व्यंकटेश अय्यर ने तीन षटकांमध्ये 23 धावा देत दोन बळी बाद केले. 174 धावांचा पाठलाग करताना मध्य प्रदेश कडून अर्पित गौड, सुब्रांशू सेनापती, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार आणि हरमित सिंग भाटिया यांनी छोटी खानी पण महत्वपूर्ण खेळी केल्या. व्यंकटेश अय्यर ने 33 चेंडूमध्ये 38 धावांची नाबाद खेळी केली. मध्यप्रदेश ने विसाव्या षटकामध्ये दिलेले लक्ष पार केले. सौराष्ट्र कडून गोलंदाजी मध्ये देखील चिराग जानी वगळता एकाही गोलंदाजाला उल्लेखनीय कामगिरी करता आली नाही. Fort in Kolhapur Kille samangad in 2024- (सामानगड )वेंकटेश अय्यरला त्याच्या अष्टपैलू खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बडोदा उपांत्य फेरीत दाखल:
चांगली कामगिरी करत असलेल्या बंगाल संघावर एकतर्फी मात करत बडोदा संघाने पण उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बडोदा संघांने सलामी वीर शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग यांच्या केळीच्या बळावर 173 धावांचे लक्ष ठेवले. बंगाल कडून स्टार गोलंदाज महम्मद शमीने दोन विकेट घेतल्या. त्याला कनिष्क सेठ व प्रदिप्ता प्रामाणिक यांनी दोन दोन बळी घेत चांगली साथ दिली. चांगल्या सुरुवातीनंतर बंगालचा संघ ढेपाळला. त्यांनी 29 धावांची सलामी दिली पण बडोद्याचा गोलंदाज मेरीवाला याच्या एकाच षटकात त्यांनी तीन विकेट्स गमावले. आणि पुढच्या षटकात अजून एक विकेट गमावत स्कोर बोर्ड 31 धावा आणि चार बाद असा झाला. खेळाचा समतोल साधताना बंगाल संघाकडून अनेक चुका झाल्या त्याच त्यांच्या पराभवासाठी कारणीभूत ठरल्या. शहाबाज अहमद ने अर्धशतक झळकावत सामन्यात चुरस निर्माण करायचा प्रयत्न केला पण त्याचे प्रयत्न फोल ठरले. हार्दिक पांड्या गोलंदाजीला आला आणि त्याने रित्विक चौधरी ला बाद करत बडोदा चा विजय सूकर केला. बडोदा चे तीन गोलंदाज मेरीवाला, अतिथं सेठ आणि हार्दिक पांड्या यांनी सोबत नऊ पर्यंत त्यांना बाद केले. या सामन्याचा सामनावीर मेरीवाला ठरला.
About SMAT TROPHY – सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी विषयी थोडेसे,
भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) दरवर्षी या ट्रॉफीचे आयोजन करते. टी ट्वेंटी फॉरमॅटमध्ये ही स्पर्धा खेळवली जाते. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेमध्ये एक मानाची स्पर्धा आहे. 2006 -2007 या सालापासून ही स्पर्धा खेळण्यात येते. या स्पर्धेमध्ये टोटल 38 टीम सहभागी होतात. पहिल्या स्पर्धेचा पंजाब संघ होता तर तमिळनाडू या संघाने स्पर्धा सर्वाधिक तीन वेळेला जिंकलेली आहे. स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा हरप्रीत सिंघ भाटिया च्या नावावर आहेत तर सर्वाधिक बळी पंजाबच्या सिद्धार्थ कौल च्या नावावर आहेत. या स्पर्धेचे नाव माझी भारतीय क्रिकेट खेळाडू सय्यद मुस्ताक अली या नावावरून ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेत संघाची विभागणी हे पाच गटांमध्ये करण्यात येते. सुरुवातीला यामध्ये साखळी फेरीचे सामने होतात. प्रत्येक गटा मधून अव्वल दोन संघ knock out पात्र ठरतात. त्यानंतर उप उपांत्य फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम सामना असे नियोजन असते. याच स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू उदयास येत आहेत. यामुळे अनेक खेळाडू ना मानाचा IPL (आयपीएल ) आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याची संधी प्राप्त होत असते.
2024 -25 मध्ये ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. मुंबई बडोदा मध्य प्रदेश आणि दिल्ली या चार संघांमध्ये विजेते पदासाठी लढत होईल. तुमच्या मते कोणत्या संघाला विजेतेपदासाठी जास्त संधी आहे हे आवर्जून सांगा. मुंबईकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यासोबत दिल्ली कडून खेळणाऱ्या प्रियांश आर्या, ईशांत शर्मा, आयुष बदोनी आणि अनुज रावत हे खेळाडू चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहेत. मध्यप्रदेश कडून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार आणि हरमित सिंह यांची कामगिरी सुद्धा उल्लेखनीय झाली असून गतवेळी थोडक्यात हुकलेले विजेतेपद मिळवण्यासाठी बडोदा संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहे. बडोदा कडून अष्टपैलू पांद्या ब्रदर्स (कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या), सलामी वीर शाश्वत रावत आणि अभिमन्यू सिंग तसेच गोलंदाज अतिथ सेठ आणि लुखमन मेरीवाला भरात आहेत. तर पाहुयात कोणता खेळाडू चमकदार कामगिरी करून आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यात यशस्वी होतो..