CYBER CRIME – A PROBLEM : (सायबर गुन्हेगारी)

सायबर गुन्हेगारी

सायबर गुन्हेगारी ही एक जागतिक समस्या निर्माण झालेली आहे. आज न्युज पेपर मध्ये आपण दररोज अशा (Cyber crime – A problem) फसवणुकीच्या बातम्या वाचत आहोत.अशा फसवणुकीच्या घटना आपल्या आजूबाजूला ही घडलेल्या असतील. आज आपण जाणून घेऊयात सायबर क्राईम म्हणजे काय? किंवा सायबर हल्ला म्हणजे काय? http://Cyber crime – A problem सायबर क्राईम कसा केला जातो? सायबर क्राईम चे प्रकार कोणते आहेत आणि आपण सायबर क्राईम पासून कसे वाचू शकतो?

सायबर क्राईम (Cyber crime) म्हणजे काय?

सायबर क्राईम हा एक गुन्हा आहे.या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षात संगणक, भ्रमणध्वनी गुन्ह्यासाठी वापरला जातो. एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एखाद्याच्या संगणका मधून मधून त्याची खरी माहिती घेणे किंवा चोरणे किंवा त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या कामासाठी करणे यालाच सायबर क्राईम असे म्हणतात. सायबर क्राईम हा मुख्यतः नफा मिळवण्याच्या हेतूने केला जातो तर काही गुन्ह्यामध्ये संगणक किंवा तत्सम उपकरणांना थेट नुकसान पोचविणे हा हेतू असतो.( Cyber crime – A problem) गुन्हा करणाऱ्या लोकांना सायबर गुन्हेगार म्हणतात तसेच या लोकांना अनेक नावे प्रचलित आहेत हॅकर्स किंवा क्रेकर्स ही त्यापैकीच काही नावे. १८ वर्षीय गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा बादशहा..(New world chess champion in 2024)

संगणक सुरक्षा (Cyber security)

Cyber security, Ciber crime report

संगणक सुरक्षेलाच सायबर सिक्युरिटी किंवा माहिती तंत्रज्ञान सुरक्षितता (आयटी सुरक्षा) म्हणून ओळखले जाते. म्हणजेच संगणक प्रणाली आणि नेटवर्कचे हार्डवेर, सॉफ्टवेर किंवा इलेक्ट्रॉनिक डेटाची चोरी किंवा हानीपासून संरक्षण करणे. संगणक सुरक्षेकडून सेवांमध्ये व्यत्यय येण्यापासून किंवा चुकीच्या दिशानिर्देशापासून संरक्षण केले जाते.

सुरुवातीला आपण सायबर गुन्हेगारीचे प्रकार पाहूयात

Cyber security portal

What is cyber security

Cyber crime

१)माहिती चोरणे किंवा डिलीट करणे

एखाद्याच्या संगणकामधील त्याची वैयक्तिक माहिती चोरून घेणे किंवा ती नष्ट करणे. एखाद्या वापरकर्त्याच्या वैयक्तिक गोष्टींची माहिती जसे की फोटो, व्हिडिओ कागदपत्रे किंवा दस्ताऐवज, त्याचा पासवर्ड बदलून मिटवले जातात.

२)शफल

यामधील दुसरा प्रकार आहे शफल
शफलिंग मध्ये एखाद्याच्या सिस्टीम मध्ये प्रवेश मिळवला जातो आणि काहीतरी माहिती काढली जाते किंवा थोडीफार माहिती बदलली जाते किंवा काही अतिरिक्त माहिती जोडली जाते.

३)बाह्य नुकसान

तिसरा प्रकार आहे तो म्हणजे बाह्य नुकसान
एखाद्याच्या संगणकाचे पार्ट तोडणे, नष्ट करणे किंवा चोरी करणे या सर्व गोष्टी बाह्य नुकसान यामध्ये समाविष्ट आहेत. एखाद्याची वैयक्तिक माहिती ऑनलाईन चोरून घेणे किंवा त्याच्यावर कायमस्वरूपी नजर ठेवणे यासारखे अनेक सायबर गुन्हे आहेत.

सायबर गुन्हेगारीचे उपप्रकार आणि त्याची माहिती

१) स्पॅमिंग

यामध्ये अनेक प्रकारचे ईमेल हे वापरकर्त्याला येतात. वापरकर्ता ज्यावेळी हे ईमेल उघडतो त्यावेळी त्यांच्या सिस्टीम मधील व्हायरस हा डाऊनलोड होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वापरकर्त्याचा संगणक किंवा भ्रमणध्वनी व्यवस्थित चालत नाही किंवा काही केसेस मध्ये तो पूर्णपणे बंद होतो.

२) फिशिंग

सायबर क्राईम मध्ये फिशिंग हा प्रकार खूप जास्त चालतो. बहुतेक लोक फिशिंग या प्रकाराला बळी पडतात. यामध्ये लोकांच्या भावनिकतेचा फायदा घेतला जातो. वापरकर्त्याच्या मनात लोभ निर्माण होईल असे बक्षीस, लॉटरी किंवा वेगवेगळ्या ऑफर अशा आशयाचे मेसेजेस त्याला पाठवल्या जातात. वापरकरता भुलून अशा ऑफर्स ना बळी पडतो. व लोभापायी जसे समोरून व्यक्ती सांगेल तसे तो करत राहतो. अजिंक्य रहाणे च्या दमदार 84 धावा, मुंबईचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश – SMAT 2024-25
त्यानंतर त्याची वैयक्तिक माहिती त्याच्या बॅंक खात्यांची माहिती मिळवली जाते. ही प्रक्रिया अत्यंत शांतपणे केली जाते. वापरकर्त्याला आपल्याला फसवले जातय त्याची थोडीशी सुद्धा कल्पना येत नाही. या विषयावर आधारित “जमतारा” ही वेब सिरीज आपण पाहिलीच असेल.

३) हॅकिंग

वापरकर्त्याची वैयक्तिक आणि संवेदनशील माहिती ही काही वेळात सोडली जाते. वापरकर्त्याची वेबसाईट, किंवा फेसबुक, इंस्टाग्राम सारखी अकाउंट हॅकर आपल्या कंट्रोल मध्ये घेतात.यासाठी ते फिशिंग मेल, सॉफ्टवेअर किंवा व्हायरस इत्यादी गोष्टींचा वापर करतात.अगदी शेवटपर्यंत वापरकर्त्यांना याची पुसटशी कल्पना देखील येत नाही. अनेक हॅकर्स मोठमोठ्या कंपन्यांचा डाटा हॅक करतात आणि त्यांच्याकडून आवाढव्य पैशाची मागणी करतात.

४) चोरी

त्या गुन्ह्यामध्ये एखाद्याची माहिती केव्हा त्याची सामग्री चोरली जाते. यामध्ये कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन होते. संगीत, चित्रपट, वेगवेगळे खेळ किंवा प्रस्थापित एप्लीकेशन डाऊनलोड करणे यामध्ये समावेश होतो. जर अशी सामग्री आपल्याला डाऊनलोड करायचे असेल तर आपल्याला त्यांची विशेष परवानगी घ्यावी लागते.
परवानगीशिवाय आपण जर अशी माहिती डाऊनलोड केली तर ती चोरी ठरते त्यानुसार गुन्हा देखील नोंद केला जाऊ शकतो.

५)व्हायरस प्रसारित करणे

ही सुद्धा एक खूप मोठी समस्या आहे. वेगवेगळे एप्लीकेशन बनवले जातात व ते संगणकामध्ये सोडले जातात किंवा काही लिंक पाठवल्या जातात. या एप्लीकेशन मध्ये किंवा लिंक मध्ये व्हायरस लपलेले असतात. यामध्ये जंत, टारझन हॉर्स, लॉजिक हॉर्स असे विषाणू असतात. हे विषाणू एका संगणका मधून दुसऱ्या संगणकाकडे आणि तिथून तिसऱ्या संगणकाकडे पाठवले जातात. त्यामुळे अशा बऱ्याचशा संगणकांना तोटा सहन करावा लागतो. परिणामी लाखो कोट्यवधी रुपयाचे नुकसान होऊ शकते.

६) फसवणुकीचे बँक कॉल

हा सरास आणि दैनंदिन जीवनात चालणारा फसवणुकीचा प्रकार आहे. यामध्ये बँक लोन संबंधी किंवा आपल्या आधी असलेल्या अकाउंट संबंधी डिटेल्स बाबत कॉल करण्यात येतो. आणि आपल्या इतर डिटेल्स मागवल्या जातात. यामध्ये जास्त करून ग्राहकाच्या क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड बद्दल माहिती विचारण्यात येते. अशी माहिती दिल्यानंतर संबंधित कार्ड मधून आपल्या पैशांची फसवणूक होते. जर डिटेल्स दिल्या नाहीत तर बँक अकाउंट वगैरे बंद करण्याची धमकी दिली जाते. यामध्ये फोन करणारा व्यक्ती एकदम आपण बँकेचे अधिकृत कर्मचारी आहोत असे भासवतो. त्यांच्या बोलण्यावर तीळ मात्र शंका येत नाही आणि फसवणूक होते.

७) सॉफ्टवेअर पायरसी

आज मार्केटमध्ये अनेक कंपन्या आपापली वेगवेगळी सॉफ्टवेअर उपलब्ध करून देतात. ही सॉफ्टवेअर अनेक वापरकर्ते वापरतात. सॉफ्टवेअरचे वापरकर्ते जितके जास्त तितका नफा त्या कंपनीला होत असतो. पण काही लोक ही सॉफ्टवेअर कॉपी करतात आणि मार्केटमध्ये कमी किमतीला विकतात. त्यामुळे मूळ सॉफ्टवेअर बनवलेल्या कंपनीला कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते. Generic medicine information in 2024

८) अफवा पसरवणे

आजच्या जगात सोशल मीडियाचा वापर करत नसलेला व्यक्ती चुकून सापडेल. याचाच फायदा घेऊन वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातात. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप, टेलिग्राम यासारख्या मीडियाचा वापर यामध्ये केला जातो आणि सामाजिक, राजकीय, धार्मिक किंवा राजकीय अफवा पसरवल्या जातात. यामध्ये सामान्य जनता भरडली जाते.

९) अश्लीलता पसरवणे

हा सुद्धा एक सायबर क्राईम आहे.यामध्ये क्राईम करणारा आपली ओळख हेतू परस्पर लपवतो. यामध्ये प्रामुख्याने किशोरवयीन मुली आणि मुली बळी पडतात. अशा किशोरवयीन मुला मुलींना हेरले जाते. व त्यांच्याशी मेसेज वर बोलणे चालू होते. नंतर ही मुले किंवा मुली त्याच्या आहारी जातात. त्यांना या गोष्टींची आणि होत नाही. यामध्ये मुलावर अत्याचार होतात किंवा त्यांना धम कावल्यासारख्या सारख्या गोष्टी घडतात. अशा गोष्टीमुळे त्या मुला मुलींचे मानसिक संतुलन ढासळते आणि ते वैफल्यग्रस्त होतात.

आता आपण पाहिले ते सायबर क्राईम चे काही प्रकार आहेत. पण हे प्रकार पासून आपण दूर राहू शकतो का? तर हो आपण यापासून स्वतःला दूर ठेवू शकतो. या साठी काही नियम आपल्याला कटाक्षाने पाळावे लागतील.

सायबर क्राईम पासून स्वतःला वाचवण्याचे उपाय

१)अज्ञात व्यक्तीकडून येणारे मेसेजेस कीवा ई-मेल यावर कधीच क्लिक करू नका.
२)अनेक वेबसाईटवर कळत नकळतपणे पण आपली वैयक्तिक माहिती कळत अथवा नकळतपणे प्रसारित करतो. अशी माहिती प्रसारित करणे टाळण्याचा प्रयत्न करावा.
३) आज आपण अनेक साहित्य ऑनलाइन मागवू न घेतो. पण असे साहित्य आपण फक्त विश्वासनीय साईटस् कडूनच मागवावे
४) ऑनलाइन पैसे पाठवताना योग्य ती खबरदारी घ्यावी.ज्याला पाठवणार त्याचे बँक डिटेल्स इतर बाबींची तपशीलवार माहिती घेऊनच पैसे ट्रान्सफर करावे.
५) कोणतीही वेबसाईट भेट द्यायचा आधी ती https:// सह उघडलेली असावी ना की फक्त HTTP ://
६) आपल्या संगणकामध्ये योग्य ते अँटिव्हायरस इंस्टॉल करा. विनामूल्य मिळणारा वायफाय शक्यतो टाळावा. तसेच स्ट्रॉंग पासवर्ड युज करावा.
७) कोणतेही एप्लीकेशन सॉफ्टवेअर इंस्टॉल करताना अधिकृत आहे याची खात्री जमा करावी.
८) ऑनलाइन किंवा कमी वेळात जास्त पैसे मिळवण्याच्या लोकांना बळी पडू नका.

सायबर क्राईम घडल्यास काय करावे?

पण बहुतेक वेळा योग्य ती खबरदारी घेऊन सुद्धा अशा सायबर क्राईम्स ना बळी पडू शकतो. जर कधी आपण अशा क्राइमला बळी पडलो तर घाबरून जाऊ नका. तुम्ही याची सायबर सेलमध्ये रीतसर तक्रार नोंदवा. ही तक्रार आपण भारत सरकारच्या सायबर क्राईम पोर्टल वर भेट देऊन ऑनलाईन तक्रार करता येते. याशिवाय भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये सायबर सेल अस्तित्वात आहेत. तिथे जाऊन आपण आपल्या सोबत घडलेल्या क्राइम ची तक्रार देऊ शकतो. असे गुन्हे आपल्या सोबत घडून येत म्हणून आपण समजत सजग पाहिजे आणि इतरांनाही त्याबद्दल माहिती देऊन त्यांना सजग केले पाहिजे. खबरदारी हाच एकमेव उपाय आहे…!