List of 39 ministers in Maharashtra – नविन मंत्रीमंडळ
मागच्या महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. यामध्ये भाजपा प्रणित महायुती ला प्रचंड यश मिळाले होते तर काँग्रेस प्रणित महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. (Devendra Fadanvis 3.0 – List of cabinet in Maharashtra) देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात नवीन सरकार स्थापन करण्याला लोकांनी मतांच्या रूपाने समर्थन दिले होते. त्याप्रमाणे ५ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती तर त्यांचे सहायक म्हणून शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी चे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. पण कोणत्याच मंत्र्याची शपथ त्या दिवशी झाली नव्हती. तेव्हापासून सर्व इच्छुकांनी आपापल्या परीने मंत्रिपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी यासाठी देव पाण्यात घातले होते. अखेर १३ डिसेंबर रोजी पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. आणि आज काल १५ डिसेंबर रोजी भाजपा च्या १९, शिवसेने च्या ११ तर राष्ट्रवादी च्या ९ मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Devendra Fadanvis 3.0 – List of cabinet in Maharashtra) हा शपथ विधी कार्यक्रम नागपूर येथील राजभवनावर पर पडला. महाराष्ट्राचे राज्यपाल राधाकृष्णन यांनी या सर्वच मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली
कशी आहे टीम देवेंद्र
देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात नवीन व जुन्या मंत्र्यांची चांगली सांगड आहे. भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी काही युवा आमदारांना नामदार केलं आहे. आपण आता पक्षनिहाय कोण कोण मंत्री झाले याची माहिती घेऊयात.http://Devendra Fadanvis 3.0 – List of cabinet in Maharashtra
१)भाजपा
भाजपा कडून सर्वाधिक १९ आमदारांनी शपथ घेतली यामध्ये ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा याचसोबत युवा असणारे जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर, माधुरी मिसाळ, डॉ पंकज भोयर आणि मेघना बोर्डीकर यांनी शपथ घेतली. भाजपा कडून ३ महिलांना संधी देण्यात आली आहे.
२) शिवसेना – एकनाथ शिंदे
त्याचसोबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून ११ मंत्र्यांनी शपथ घेतली यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराजे देसाई, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर, आशिष जैस्वाल आणि योगेश कदम यांचा समावेश होतो.
शिवसेना पक्षाकडून एकाही महिला आमदाराला मंत्रिपदाची संधी देण्यात आलेली नाही.
३) राष्ट्रवादी – अजित पवार
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंढे, दत्तात्रय भरणे, अदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, इंद्रनील नाईक या नऊ आमदारांचा शपथ विधी पार पडला
महायुती सरकारने एकंदरीत सर्वच घटकांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामधील महत्वाच्या मंत्रिपदाच्या वादावरून हा शपथविधी रखडला होता. वरील पैकी एकूण १८ आमदारांनी पहिल्यांदाच मंत्री म्हणून शपथ घेतली. एकूण ४३ मंत्री असलेल्या सभागृहात आजअखेर पर्यंत ४२ जणांचा शपथविधी पार पडला आहे. मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर १० दिवसांनी महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ आकार घेत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचे आणि नवीन मंत्र्यांचे अभिनंदन केले. येथे बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी सर्वच नवनिर्वाचित मंत्र्यांचे अभिनंदन करतो. मला आशा आहे शिवसेनेचे सर्वच मंत्री सामान्य नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी आपल्या पदाचा वापर करतील. त्याचसोबत अजित पवार म्हणाले, ज्यांना कॅबिनेट मंत्री नाही होता आले ते राज्यमंत्री म्हणून काम करतील. शिवाय अडीच वर्षांनी आम्ही इतरांना ही संधी देऊ. CYBER CRIME – A PROBLEM : (सायबर गुन्हेगारी) त्यामुळे नाउमेद न होता, लोकांची, जनकल्यानाची कामे करत रहा. राहिलेली एक जागा कुणाच्या पदरात पडते हे सुध्दा पहावे लागेल. या एका जागेसाठी काही धक्कातंत्र होईल काय हे पुढे आपल्याला कळेलच.
यांचे हुकली संधी
सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीने धक्का तंत्र वापरताना जुन्या सभागृहातील जवळपास १२ मंत्र्यांना नारळ दिला आहे. यामध्ये दिलीप वळसे पाटील, रवींद्र चव्हाण यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला आहे. रवींद्र चव्हाण हे ४ वेळेचे आमदार असून ते ठाण्या मधून डोंबिवलीतून निवडून येतात. ते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत अस मानलं जात. तेच पुढचे मुख्यमंत्री असतील अस वाटत असताना त्यांना मंत्रिपद ही नाकारण्यात आल्यानं त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे. त्याचसोबत ७ वेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना देखील भाजपा ने धक्का देताना मंत्रिपदापासून वंचित ठेवले. लोकसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव आणि त्यावेळी घेतलेली नरमाईची भूमिका याला कारणीभूत आहे अस आता सांगितलं जातंय. छगन भुजबळ हे सात वेळेचे आमदार आणि माझी उपमुख्यमंत्री यांना सुध्दा मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेलं नाही. ते एक मोठे ओबीसी नेते असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व छगन भुजबळ यांच्यात रंगलेला कलगीतुरा यामुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आल्याची माहिती आहे. भुजबळ हे अखिल भारतीय समता परिषद चे अधक्ष्य देखील आहेत. दिलीप वळसे पाटील हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदार संघातून निवडून येतात. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचे मंत्रिपद नाकारण्यात आल्याचे ते स्वतः सांगत आहेत. ते सुद्धा ७ व्यादा आमदार बनले आहेत. त्याचसोबत सेनेचे अब्दुल सत्तार हे त्यांच्या विविध विधानामुळे कायम चर्चेत असतात. भाजपा वरिष्ठ नेते याबाबतीत फारच काळजी घेत असल्याने त्यांची वर्णी लागू शकली नाही. याचसोबत कोकणातून येणारे दीपक केसरकर हे शिवसेना पक्षाचे आमदार असून त्यांचा समावेश नसणं हे देखील खूप काही सांगून जातो. याविषयी बोलताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपुख्यमंत्री म्हणाले की आमच्याकडे अजून खूप अशा पदांची महाभरती होणार आहे. त्यापैकी काही पदांची धुरा अशा ज्येष्ठ नेत्यावर सोपवण्यात येणार आहे. Village or town? Which one is better (गाव की शहर)
सर्वसमावेशक मंत्रिमंडळ
महाराष्ट्रातील पाच ही विभागांना आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्यात आला आहे असे महायुती च्या प्रमुख नेत्यांचे म्हणणे आहे.(Devendra Fadanvis 3.0) हे एक सर्वसमावेशक मंत्रिमंडळ आहे. यामध्ये महिला आहेत, सर्व समाजातील व्यक्ती आहेत ओबीसी, एसटी, येससी आणि बरेच अस देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी ही मंत्रिपदे अढीच वर्षासाठी असतील असे सांगितले आहे. पण जर कुणाचा परफॉर्मन्स खराब असेल तर वेळेआधी सुद्धा मंत्रिपद काढून घेण्यात येईल असे सांगितलं गेलं आहे. पण याउलट भाजपा कडून असे काही आताच जाहीर करण्यात आलेले नाही. पण याबाबत जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, ठराविक कालावधीने आम्ही आमच्या सर्व मंत्र्यांचे ऑडिट करू आणि त्यानुसार आमचे वरिष्ठ निर्णय घेतील.
New faces – नवीन चेहरे
महायुती च्या मंत्री मंडळात या वेळी बऱ्याच नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आणि सिडको चे अधक्ष संजय सिरसाठ, सरपंच ते मंत्री असा प्रवास राहिलेले महाड चे आमदार भरत गोगावले, ठाणे मधून निवडून येणारे प्रताप सरनाईक तसेच राधानगरी सारख्या तालुक्यातून आलेले प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेले आहे तर राज्यमंत्री म्हणून आशिष जैस्वाल आणि रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम या सर्वांनी शिवसेना पक्षाकडून पहिल्यांदा मंत्री होण्याचा मान मिळवला आहे.अजित पवार यांनी देखील 9 पैकी तब्बल 5 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. इंद्रनील नाईक यांना पहिल्यांदाच राज्य मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. याचसोबत भाजपकडून ही सुमारे ६-७ नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आलीय.