UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA


महाराष्ट्र, एक उत्साही राज्य आणि सध्या खूप वेगाने प्रगतीपथावर असलेल्या राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पहिले जाते. महाराष्ट्राचा वारसा आणि संस्कृती पूर्ण देशामध्ये खूप मोलाची आहे. मुंबई, पुणे, नागपूर यासारखी मोठी मोठी शहरे याच महाराष्ट्र मध्ये आहेत. उद्योगधंदे व्यापार नोकरीच्या निमित्ताने अनेक तरुण-तरुणी महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये वास्तव्यास आहेत. (UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA) दळणवळणाच्या चांगल्या सोयी  उपलब्ध असल्यामुळे मोठमोठी शहरे एकमेकांशी जोडली केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये अनेक शहरे आजही एकमेकाशी जोडली जात आहेत.  यासाठी काही प्रस्तावित महामार्ग महाराष्ट्र सरकारने तयार करण्याचे ठरवले आहे. ते महामार्ग नेमके कोणते? कोणत्या शहरातून जाणार? याची नेमकी माहिती आपण या लेखातून घेणार आहोत. UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA

१) शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Express way

हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग ठरणार आहे. हा महामार्ग नागपूर आणि गोवा यांना जोडणारा आहे. या महामार्गावर आई तुळजाभवानी मंदिर, अंबाबाई मंदिर आणि पत्रा देवी मंदिर अशा अलौकिक शक्ती प्राप्त झालेल्या देवतांची मंदिरे लागणार आहेत. त्यामुळे या महामार्गाचे नामकरण शक्तीपीठ महामार्ग असे करण्यात आलेले आहे.  हा महामार्ग महाराष्ट्रातील एक अति महत्त्वाचा महामार्ग आहे जो नागपूरला थेट गोव्याशी जोडणार आहे. उत्तम कनेक्टिव्हिटीमुळे या महामार्गावर उद्योगधंदे पर्यटन वाढण्याची आशा आहे.  या महामार्गाची लांबी जवळपास 760 किलोमीटर इतकी असणार आहे. हा महामार्ग सहा लेनचा बनणार आहे. नागपूर मधून सुरू होऊन हा महामार्ग महाराष्ट्रातील या जिल्ह्यातून जाऊन गोव्यातील पत्रादेवी येथे थांबणार आहे.  हा प्रकल्प एम एस आर डी सी च्या अंतर्गत आहे. एम एस आर डी सी म्हणजे महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन होय.  हा महामार्ग झाल्यानंतर प्रवासाचा वेळ जवळपास 15 ते 17 तासांनी कमी होणार आहे. सध्या असलेले गोवा ते नागपूर हे अंतर ११२० किलोमीटर आहे  ते कमी होऊन फक्त ७६० किलोमीटर इतके राहील.  याचा अंदाजे खर्च 83 हजार 600 कोटी रुपये इतका आहे. (UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA)

2) कोकण एक्सप्रेस वे

Konkan Express way

हा एक्सप्रेस वे सुद्धा प्रस्तावित आहे. हा महामार्ग सुद्धा एमएसआरडीसी च्या अंतर्गत आहे. या प्रस्तावित महामार्गाची लांबी सुमारे 388 किलोमीटर इतकी आहे.  हा महामार्ग पनवेल मधून सिंधुदुर्ग ला जोडेल. त्याचसोबत रायगड आणि रत्नागिरी हे दोन मोठे जिल्हे  या महामार्गावर राहतील. हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे महाविकास आघाडीने प्रस्तावित केला होता. हा एक्सप्रेस वे समुद्रकिनाऱ्याला समांतर असा धावणार आहे.  पनवेल, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग  या जिल्ह्यांच्या विकासाला हा महामार्ग कारणीभूत ठरेल. ह्या महामार्गासाठी 25000 करोड इतका निधी गरजेचा आहे.  या महामार्गामुळे मुंबई ते सिंधुदुर्ग हे अंतर केवळ पाच तासांमध्ये कापण्यात येईल. या प्रकल्पासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे.

३)  छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस वे

Chatrapati sambhajinagar express way

पुणे ,चाकण आणि शिंगणापूर परिसरातील वाहतूक कोंडी लक्षात घेता  हा महामार्ग बनणे अत्यंत गरजेचे आहे.  हा महामार्ग पुणे ते छत्रपती संभाजीनगर यांना जोडणारा दुवा आहे.  हा प्रकल्प बी ओ टी म्हणजेच बिल्ड ऑपरेट आणि ट्रान्सफर या तत्त्वावर निर्माण करण्यात येणार आहे.  हा सुमारे 225 किलोमीटर लांब प्रस्तावित एक्सप्रेस वे असून याला अंदाजे दहा हजार करोड रुपये इतका निधी गरजेचा आहे. याच एक्सप्रेस वेला पुढे समृद्धी महामार्गाला जोडण्याचा विचार पण चालू आहे.  हा एक्सप्रेस वे पुणे अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्यांना तसेच पाच तालुक्यांना जोडण्यात येणार आहे.  नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने होणाऱ्या  महामार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे.

४)  जालना ते नांदेड एक्सप्रेस वे

Jalna – Nanded express way

हा मराठवाड्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
हा प्रकल्प  मराठवाड्यातील महत्वाच्या जिल्ह्यांना जोडणार आहे.  यामध्ये प्रामुख्याने जालना,  परभणी, हिंगोली आणि नांदेड चा समावेश आहे. हा प्रस्तावित एक्सप्रेसवे या चारही जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाची जोडतो.  सध्या असलेले जालना ते नांदेड हे 225 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 179 किलोमीटर इतके राहील.हा महामार्ग एकूण ८७ गावांमधून जातो.  या महामार्गासाठी ११६८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.

५)  विरार ते अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर

Virar – Alibaug multi model corridor

हा महामार्ग बरीच वर्ष फक्त कागदोपत्री होता.  पण याच्या बांधकामासाठी सध्या निविदा मागवण्यात आल्या आहेत. या महामार्गासाठी 19334  करोड रुपये  इतक्या खर्चाची तजवीज करण्यात आलेली आहे.  हा महामार्ग फक्त १२६ किलोमीटर लांबीचा असेल.  पण यामध्ये टोटल 14 लेन असतील.  हा प्रकल्प पालघर मधील विरार ते रायगड मधील अलिबाग इथपर्यंत असेल.  हा प्रकल्प रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडेल.  हा प्रकल्प साधारणता दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात जवळपास 96 किलोमीटर हे दुसऱ्या टप्प्यात 29 किलोमीटरचे काम होईल.  हा प्रकल्प एम एस आर टी सी च्या अंतर्गत असून पूर्ण करण्याचा त्यांचा निर्धार आहे. UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA

६)  सुरत ते चेन्नई एक्सप्रेस वे

Surat – Chennai express way

हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प गुजरात मधील सुरत ते तमिळनाडूमधील चेन्नई या दोन मोठ्या शहरांना जोडेल.  याची टोटल लांबी 1271 किलोमीटर इतकी आहे.  हा प्रकल्प बहुदा चार ते सहा त्यांचा असेल.  हा प्रकल्प सहा राज्यातून जाईल. गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा,आंध्रप्रदेश, तामिळनाडू ही ती सहा राज्ये होत.  हा एक्सप्रेस वे महाराष्ट्र च्या नाशिक, अहमदनगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यामधून जाईल  तसेच याची महाराष्ट्रातील लांबी  चारशे किलोमीटर इतकी असेल.  नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया त्या महामार्गासाठी भूसंपादन करत आहे.  तसेच महाराष्ट्रातील या प्रकल्पाच्या कार्य  करण्यासाठी निविदा मागवण्यात आलेल्या आहेत.  या प्रकल्पासाठी 500000 करोड रुपये इतका खर्च झाला असून हा प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येईल. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राची आणि दक्षिण भारताशी कनेक्टिव्हिटी सुधारेल  आणि उद्योग आणि व्यापाऱ्याला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे.

७) नागपूर ते गडचिरोली एक्सप्रेस वे

Nagpur – Gadchiroli express way

हा एक्सप्रेस वे एमएसआरडी सी द्वारे प्रस्ताविक करण्यात आलेला आहे.  यालाच ईस्टर्न महाराष्ट्र एक्सप्रेस वे असे म्हणून देखील ओळखले जाते. हा एक्सप्रेस वे141 किलोमीटर लांब आहे.  हाय एक्सप्रेस वे नागपूर, भंडारा आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यामधून जाईल. हा एक्स्प्रेसवे टोटल चार लेन् चा असेल.  हा एक्सप्रेस वे म्हणजे समृद्धी महामार्गाची विस्तारित आवृत्ती आहे.  बारा हजार करोड या बांधकामासाठी खर्च होतील. ह्या एक्स्प्रेस यांच्या पूर्ण बांधकामानंतर नागपूर ते गडचिरोली हा प्रवास फक्त दोन तासात होईल.

८)  पुणे ते बेंगलोर एक्सप्रेस वे

Pune – Bengaluru express way

Pune - Bengluru express way
Image of Pune – Bengaluru express way
Reference – Instagram

हा एक नियोजित ग्रीनफिल्ड Devendra Fadanvis 3.0 – List of cabinet in Maharashtra एक्सप्रेस वे आहे जो महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सुरू होऊन कर्नाटकातील बेंगलोर मधे संपून जाईल.  हा एक्सप्रेस वे नॅशनल हायवे नंबर 48 च्या समांतर धावणार आहे.  हा एक्सप्रेस वे महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यामधून जाईल तर  कर्नाटक मधील बेळगाव, बागलकोट, गदग, विजयनगर,  तुमकुर, कोपल,देवनगिरी, चित्रदुर्ग आणि बेंगलोरु ग्रामीण अशा नऊ जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहे.  हा महामार्ग टोटल 12 जिल्ह्यांमधून जाईल.  हा एक्सप्रेस वे जवळपास 700 किलोमीटर इतका लांब असेल आणि यासाठी आठ लेनचा उपयोग करण्यात येईल.  या महामार्गाच्या निर्माण साठी जवळपास 50 हजार करोड इतका खर्च अपेक्षित आहे. पुणे व बेंगलोर हे अंतर कापण्यासाठी या महामार्गानंतर सहा ते सात तास लागतील. केवळ अंतरच कमी होणार नाही तरी या महमर्गामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन यांना चालना मिळेल. 2018 मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण होईल अशी अपेक्षा आहे.

९) समृद्धी महामार्ग

Samruddhi Express way

Construction of Samruddhi Express way
Reference image – Samruddhi Express way

हा महामार्ग सध्या कार्यान्वित आहे. पण याचे पूर्ण काम अजून झालेले नाही. हा महामार्ग पूर्णपणे 2025 मध्ये तयार असेल. हा महामार्ग महाराष्ट्र मधील मुंबई ते नागपूर पर्यंत आहे. या महामार्गाला हिंदु रुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने देखील ओळखले जाते. महामार्गाची लांबी 700 एक किलोमीटर इतकी लांब असून हा मार्ग महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडतो. हा महामार्ग सध्या नागपूर ते इगतपुरी असा कार्यान्वित आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चालू करण्यात आला.  तू टप्पा 520 किलोमीटर लांबीचा आहे.  त्यानंतर शिर्डी ते इगतपुरी हा दुसरा टप्पा 2023 मध्ये कार्यान्वित करण्यात आला.आता शेवटच्या टप्प्याचे 101 किलोमीटरचे काम पूर्णत्वाकडे आलेले आहे. हा महामार्ग महाराष्ट्र राज्याच्या औद्योगिक सामाजिक आणि आर्थिक वाढ होण्यास चालना देतो.  हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी गेम चेंजर आहे.  मुंबई ते नागपूर हा प्रवास एकदम गतिशील आणि सोपा होणार आहे.

१०) मुंबई ते दिल्ली महामार्ग

Mumbai – Delhi express way

तेराशे पन्नास किलोमीटर लांबीचा हा महामार्ग सर्वात लांबीच्या महामार्गापैकी एक आहे.  या महामार्गावरून ताशी 120 किलोमीटर इतक्या वेगाने आपल्याला जाता येईल.  हा महामार्ग भारताची राजधानी दिल्ली तसेच आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडेल.  हा महामार्ग भारतातील सहा राज्यांमधून जातो. यामध्ये दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे.  महाराष्ट्रात हा महामार्ग रायगड ठाणे आणि पालघर या तीन जिल्ह्यांमध्ये असेल.  मुख्य महामार्ग हा मुंबई ते दिल्ली असून त्याची लांबी 1198 किलोमीटर इतकी आहे.  हा महामार्ग सध्या आठ आहे पण भविष्यात हा 12 ते 14 लेन पर्यंत विस्तारित करण्यात येईल. प्रवासाचा वेळ जवळपास बारा तासांनी कमी होईल. (Mushroom farming : 1 farming business)

तर आपण महाराष्ट्रातील टॉप टेन महामार्ग आपण पाहिले. काही महामार्गाचे अंशतः काम पूर्ण झालेले आहे तसेच लोकार्पणही झालेले आहे.  या महामार्गाची कामे 2030 या सालापर्यंत पूर्ण झालेली असतील. त्यामुळे दळणवळण सुलभ होईल त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक वाढ होण्यास बळ मिळेल.  केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे रत्न नितीन गडकरी यांचे यामध्ये मोठे योगदान आहे.  तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला अवश्य कळवा..!!