“Shaktipeeth” express way

Shaktipeeth” highway will pass through these 57 villages of Kolhapur.

कोल्हापूरच्या ५७ गावातून जाणार “शक्तिपीठ” महामार्ग

Shaktipeeth express way

Shaktipeeth express way route

“Shaktipeeth” highway will pass through these 57 villages of Kolhapur

शक्तिपीठ महामार्ग हा राष्ट्रीय महामार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग म्हणजे देशातील महत्वाचे महामार्ग असतात. सुमारे ६६००० किलोमीटर इतके प्रचंड अंतर हे राष्ट्रीय महामार्गनी व्यापलेले आहे. राज्यातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी महाराष्ट्र मध्ये अनेक नवीन महामार्ग प्रस्तावित आहेत. समृद्धी महामार्गा नंतर शक्तिपीठ या महामार्गाची घोषणा करण्यात आली आहे. (“Shaktipeeth” express way) नागपूर ते गोवा द्रुतगती महामार्ग ज्याला आपण शक्तीपीठ महामार्ग म्हणून ओळखत आहोत तो एकूण 13 जिल्ह्यामधून जाणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील बारा जिल्हे गोवा राज्यातील एका जिल्ह्याचा समावेश आहे.आता आपण महाराष्ट्रातील ते 12 जिल्हे कोणते ते पाहूयात.  त्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. तसेच गोवा राज्यामधील उत्तर गोवा या जिल्ह्याचा समावेश आहे. हा महामार्ग वर्धा या जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.  आजच्या लेखात आपण पाहूयात कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे? (Shaktipeeth” highway will pass through these 57 villages of Kolhapur ) तसेच कोणकोणती गावे यामध्ये संभावित आहेत त्याच सोबत कोल्हापुरातून या महामार्गाला का विरोध होत आहे?

मुंबई ते नागपूर बनवण्यात येत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या धरतीवर 2023 मध्ये  त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तिपीठ महामार्गाची घोषणा केली. (Shaktipeeth” highway will pass through these 57 villages of Kolhapur) महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या तीन शक्तीपीठ यांना हा महामार्ग जोडणार आहे त्यामुळे याचे नामकरण शक्तिपीठ महामार्ग असे करण्यात आले.  हा महामार्ग जवळपास 800 किलोमीटर लांब आणि सहा लेन चा असेल. महाराष्ट्र मधील सर्वात लांब पल्ल्याचा हा महामार्ग ठरेल.  माहूरची रेणुका देवी, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूर मधील अंबाबाई  महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली तीन शक्तीपीठे या महामार्गामुळे जोडण्यात येणार आहेत. त्याच सोबतच बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी वैजनाथ आणि औंढा नागनाथ ही दोन पर्यटन स्थळ जोडली जात आहेत. त्याच सोबतच वारकरी संप्रदायाचे महत्वपूर्ण पंढरपूरचे विठ्ठल मंदिर, नांदेड मधील श्री गोविंद सिंग यांचा गुरुद्वारा, सोलापूर मधील सिद्ध रामेश्वर मंदिर,आदमापूरचे बाळूमामा मंदिर, कोल्हापूर मधील कनेरी मठ, पट्टणकोडोली चे विठ्ठल बिरदेव मंदिर, नरसोबाची वाडी चे दत्त मंदिर,  अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा  आणि औदुंबर ही सर्व तीर्थस्थळे एकमेकांशी जोडली जाणार आहेत.  हा प्रस्तावित महामार्ग बारा जिल्ह्यातून जात असून पुढे तो गोवा आणि महाराष्ट्र यांच्या बॉर्डरवर कोकण एक्सप्रेस वे ला जोडला जाणार आहे. गोवा ते मुंबई यांच्यामध्ये असणाऱ्या महामार्गाला आपण कोकण एक्सप्रेस वे म्हणून ओळखतो. (UPCOMING TOP 10 EXPRESS WAYS IN MAHARASHTRA)

या महामार्गामुळे महाराष्ट्राचे मुख्यता तीन विभाग कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ एकमेकांशी जोडली जात आहेत.या महामार्ग साठी साधारणता 27 हजार पाचशे एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. या महामार्गावर आठ रेल्वे क्रॉसिंग,तीस बोगदे, अठ्ठेचाळीस मोठे पुल आणि तब्बल 26 ठिकाणी इंटरचेंज असणार आहे.

या प्रकल्पाला कोल्हापुरातून होतोय प्रचंड विरोध

There is opposition to the Shaktipeeth highway

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ठरणाऱ्या या महामार्ग  बनवण्यासाठी साहजिकच जैवविविधतेचे मोठे नुकसान होणार आहे. फार मोठ्या नैसर्गिक हानी ला हा प्रकल्प कारणीभूत ठरणार आहे. त्यासोबतच वायू प्रदूषण,ध्वनी प्रदूषण, काही अंशी जल प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तीस बोगदे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर डोंगर पोखरले जाणार आहेत. त्याच सोबत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड देखील करावी लागणार आहे. अनेक ठिकाणी भर घालावी लागणार आहे त्यासोबत छोट्या मोठ्या नद्या व नाले यांचे पाणी अडवावे किंवा त्यांचा पात्र बदलावे लागणार आहे. त्यामुळे महापुर सारख्या परिस्थितीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कोल्हापूर मध्ये दरवर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असतेच. त्यामुळे पर्यावरण आणि छोटी मोठी शेतकरी यांच्यासाठी हा प्रकल्प हानिकारक आहे. त्यामुळे ह्या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून फार मोठा विरोध सहन करावा लागत आहे.  कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून हा महामार्ग जाणार आहे.  त्यामध्ये हातकणंगले, कागल, शिरोळ, करवीर, भुदरगड आणि आजरा या तालुक्यांचा समावेश आहे.  येथील शेतकऱ्यांचा या महामार्गाला पूर्णपणे विरोध आहे. त्यासाठी येथे अनेक वेळा आंदोलन उभे करण्यात आले. या महामार्गाला विरोध होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे कोल्हापूर पट्ट्यामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय आहे.या महामार्गामध्ये कृष्णा, पंचगंगा,दूधगंगा, वेदगंगा,भोगावती प्रमुख नद्यांच्या काठी असणारी सुपीक जमीन महामार्गामध्ये जाणार आहे. उपजीविकेचे साधन हातून जात असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर खूप मोठे प्रश्न चिन्ह उभे आहे. जर या महामार्गासाठी जमिनी संपादित केल्या शेतकरी वर्ग अल्पभूधारक होईल अथवा भूमीहीन होईल. यातील ७० टक्के जमिनी बारा महिने ओलिताखाली आहेत. त्याचसोबत या जमिनी रस्ते, रेल्वेमार्ग,  कारखाने, तीर्थस्थळे, औद्योगिक वसाहती यांना लागूनच आहेत. त्यामुळे या जमिनीच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. मुळे यामध्ये शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने अल्पभूधारक आहेत. त्यांच्या या जमिनी जर महामार्गामध्ये गेल्या तर त्यांच्या उपजीविकेसाठी काही साधन उरणार नाही. त्यामुळे येथील शेतकरी नाराज आहेत आणि ते या महामार्गाला कडाडून विरोध करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या महामार्गाला स्थगिती देण्यात आली होती. कोल्हापूर मधील राजकीय पुढाऱ्यांनी हा महामार्ग होणार नाही असे सांगितले होते. पण पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही स्थितीत हा महामार्ग पूर्ण होईल. शेतकऱ्यांचे जे  प्रश्न असतील ते निकाली काढण्यात येतील असे उद्गार पत्रकारांशी बोलताना काढले होते. या महामार्गाला अनेक जिल्ह्यात विरोध होत असला तरी कोल्हापूर मधून सर्वात जास्त विरोध होत आहे आणि तो योग्य ही आहे.

कोल्हापुरातील या ५७ गावातून जाणार शक्तिपीठ महामार्ग

ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातून आणि 57 गावातून हा महामार्ग जाणार आहे.  त्या सर्व गावांची यादी पुढील प्रमाणे आहे. (Amboli)
१) करवीर
हे करवीर तालुक्यातील 10 गावांचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने सांगवडे, सांगवडे वाडी,  हलसवडे, नेरली, विकासवाडी, कनेरीवाडी, कनेरी, या वडगाव, कोगील बुद्रुक आणि खेबवडे या गावांचा समावेश आहे.

२) हातकणंगले
तिळवनी, साजणी, माजगाव,  हातकणंगले आणि पट्टणकोडोली या पाच गावांचा समावेश आहे.

३)शिरोळ
  शिरोळ तालुक्यातील फक्त चार गावांचा समावेश असून यामध्ये कोथळी, दानोळी, निमशिरगाव आणि तारदाळ यांचा समावेश आहे.

४) कागल
यामध्ये कागल तालुक्यातील बारा गावांचा समावेश आहे.  ती बारा गावे पुढील प्रमाणे आहेत.
कागल, व्हन्नुर, सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हणाळी, कोनवडे, सावर्डे बुद्रुक, सावर्डे खुर्द,  सोनाळी, कुरणी आणि निढोरी.

५) भुदरगड
भुदरगड तालुक्यातील आदमापुर, वाघापूर, मडीलगे बुद्रुक, मडीलगे खुर्द, निळपण, दारवाड,  म्हसवे, गारगोटी, आकुर्डे, सोनारवाडी, पुष्पनगर,  मडूर, करडवाडी, शेळोली, सोनुर्ली, मेधोली, नवले, देवरडे,कारिवडे, व्हणगुत्ती  या गावांचा समावेश आहे.  भूदरगड तालुक्यातील सर्वाधिक 21 गावे ही  या प्रकल्पाच्या खाली जाणार आहेत.

६) आजरा
आजरा तालुक्यातून पाच गावे या प्रकल्पाच्या आख्यारीत आहेत. यामध्ये दाभिल, शेळप, पारपोली, सुळेरान आणि अंबर्डे यांचा समावेश आहे.

शक्तिपीठ महामार्ग खरंच गरजेचा आहे का?

पश्चिम घाट हा जैवविविधतेने नटलेला आहे. जागतिक वारसा स्थळांमध्ये पश्चिम घाटाचा समावेश होतो. या महामार्गामुळे जैवविविधतेचे फार मोठे नुकसान होणार आहे.  कोल्हापूर मधील भुदरगड आणि आजरा या दोन तालुक्यांमध्ये फार मोठी जंगली झाडे मी पशुपक्ष्यांच्या अस्तित्वाची चिन्हे आहेत. यासोबतच पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली, आणि दोडामार्ग हे तालुके देखील जैवविविधतेचे हॉटस्पॉट आहेत. या प्रकल्पाची योजना त्या मागचा हेतू हा लोक विधायक जरी असला तरी येथील जैवविविधतेची फार मोठी हानि करणारा आहे.  त्यामुळे प्रकल्पाला फार मोठा विरोध होण्याची चिन्हे आहेत.भारत हा कृषिप्रधान देश आहे.  त्यातील 70 टक्के लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.असे असताना अन्नदाता शेतकरी जर भूमीहिण किंवा अल्पभूधारक होणार असेल तर अशा प्रकल्पाची गरजच काय? तसं पाहायला गेलं तर कोल्हापूर मधून गोव्याला जाण्यासाठी चांगली कनेक्टिव्हिटी आहे. संकेश्वर ते बांदा हा राष्ट्रीय महामार्ग सुद्धा जवळून जातो.  शिवाय या महामार्गाला लोकांच्या कडून मागणी झालेली नाही. असे असताना महामार्ग बनवण्याचा घाट का घातला जातोय हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे..!