Fort in Kolhapur Kille samangad in 2024- (सामानगड )

भारताच्या पश्चिम समुद्रकिनारी भक्कमपणे उभी असणारी डोंगराची रांग म्हणजे सह्याद्री. यालाच पश्चिम घाट असेही म्हणतात. ( Fort in kolhapur – Kille samangad in 2024) जवळपास 1600 किलोमीटर असणारी ही पर्वतरांग महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डर पासून सुरू होते ती पार तमिळनाडू केरळ च्या दक्षिण टोकाला संपते. महाराष्ट्रात सह्याद्री सुमारे 660 किलोमीटर लांब व सुमारे 100 किलोमीटर रुंद आहे.  सह्याद्री हा अधिक जैवविविधता असलेला प्रदेश आहे. दख्खनच्या पठारातील अंतर्गत हालचालीमुळे तयार झालेली कड म्हणजे सह्याद्री.  याच सह्याद्रीच्या बेचक्यात असंख्य शिखरे, पठारे  आणि गडकोट आहेत. याच गड कोटांनी गौरवशाली महाराष्ट्राचा इतिहास जपला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडकोटांच्या सहाय्याने स्वराज्य निर्माण केले.  सह्याद्रीत असे असंख्य गडकोट आजही त्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देत दिमाखाने उभे आहेत. सह्याद्री डोंगर रांगेत पन्हाळगड, रायगड,  Top 10 places to visit in kolhapur (कोल्हापूर शहरातील १० प्रेक्षणीय स्थळे)सिंहगड, तोरणा, प्रतापगड, अजिंक्यतारा, विशाळगड,  लोहगड, राजगड, पुरंदर सारखे अनेक महत्त्वाचे किल्ले  आहेत.  पण यात सोबत काही अपरिचित किल्ले सुद्धा सह्याद्री मध्ये आहेत. आज आपण अशाच, लोकांना फारसा  ज्ञात नसलेल्या किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला, वनवासामध्ये साक्षात प्रभू रामचंद्रांनी राहण्यासाठी निवडलेला किल्ला,  प्रतापराव गुजर यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला, इंग्रजा विरोधात प्रथम उठाव करण्यात आलेला किल्ला म्हणजेच सामानगड.

History of Samangad (सामानगडाचा इतिहास)

Samangad fort trek

Samangad

सामानगड, ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारा हा किल्ला पण पर्यटनाच्या दृष्टीने मागास असलेला असा हा किल्ला आहे. हा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, गडहिंग्लज तालुक्यामध्ये, महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर डौलाने उभा आहे.  कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेल्या गड-वैभवामध्ये भुदरगड, रांगणा,  पन्हाळगड, विशाळगड, पारगड ह्या किल्ल्यांच्या मधोमध हा किल्ला उभा आहे. आजूबाजूच्या गडकोटांना रसद पुरवणीच्या दृष्टीने  ह्या किल्ल्याची  महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यामुळेच कदाचित याला सामानगड असे नाव मिळाले असावे. कोल्हापूर जिल्ह्याचे दक्षिणेस तालुक्याचे ठिकाण असणाऱ्या गडहिंग्लज पासून साधारणता आठ ते दहा किलोमीटर इतक्या अंतरावर  सामानगड वसलेला आहे. सामानगडाच्या पायथ्याला चिंचेवाडी हे गाव लागते. येथून सरळ रस्त्याने गेल्यावर आपल्याला गडावर पोचता येते. तर चिंचेवाडी गावापासून उजव्या बाजूला पायऱ्यांच्या मार्गाने आपण जुन्या हनु मान मंदिरापर्यंत पोचू शकतो. कोल्हापूर पासून साधारणपणे 75 किलोमीटर अंतरावर,  समुद्रसपाटीपासून 2900 फूट उंचीवर,  राखणदाराच्या रूपात किल्ले सामानगड उभा आहे. साधारणता कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व किल्ले हे शिलाहार राजा भोज  दुसरा यांनी निर्माण केले आहेत.  सामानगड बांधणीचे श्रेय सुद्धा राजाभाऊ यांनाच जाते.  इसवी सन 1667 मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्यात सामील करून घेतला. त्यानंतर हा किल्ला कधी मोगल साम्राज्याकडे तर कधी मराठी साम्राज्याकडे येत जात राहिला. 1704 मध्ये हा किल्ला परत मराठ्यांच्या कडे आला.  त्यानंतर 1844 मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर सत्ता काबीज केली. त्यावेळी त्यांनी तोफा लावून या गडाची प्रचंड मोडतोड केली

What is there to see at the fort? (किल्ल्यावर पाहण्यासारखे काय काय आहे?)

Fort trekking in kolhapur

१) गडावरील बुरुज

गडावर पोहोचताच समोर दर्शनी बुरुज लागतो. गडावर एकूण दहा बुरुज आहेत. शिवकाळात याच किल्ल्यावरून आजूबाजूला असलेल्या पारगड, रांगणा,भुदरगड आणि विशाळगड या किल्ल्यांना महत्त्वाच्या साहित्याची रसद पुरवली जायची. गडावर  गेल्यावर डाव्या  बाजूला झेंडा बुरुज लागतो. सामानगडाला शिवकालीन इतिहासासोबतच ब्रिटिश कालीन इतिहासाची ही साक्ष आहे. जेव्हा इंग्रजांनी कोल्हापूर परिसरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली तेव्हा सर्वप्रथम त्यांच्या विरोधात सामान गडावरूनच बंडाचे निशान फडकवण्यात आले. म्हणूनच या  बुरुजाला झेंडा भरून असे म्हणतात.  याच  बुरुजा सोबत किल्ल्यावर वेताळ बुरुज सुद्धा उपलब्ध आहे. वेताळ बुरुजावरून कर्नाटकच्या बाजूला पहारा देता यायचा. पूर्व दिशेला गडाच्या निमुळत्या भागाकडे सोंडी बुरूज आहे. त्या   बुरुजासमोर समान उंचीची एक टेकडी आहे. सोंडी बुरुज ताब्यात घेण्यासाठी मुघलांनी श्रमदानातून ही टेकडी उभी केली असा समज आहे. म्हणून या टेकडीला मुघल टेकडी असेही म्हणता

२) धान्य कोठार

झेंडा बुरुजापासून थोडं चालत आले की जमिनीच्या अंतर्भागात गोलाकार खड्डे दिसतात. हे गोलाकार खड्डे म्हणजेच त्या काळात धान्य साठवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी धान्य कोठारे होय.वरून फक्त एक माणसाला जाता येईल इतकी निमुळती असणारी ही धान्य कोठारे जमिनीच्या अंतर्भागात खूप मोठी आहेत.

३) गडावरील विहिरी

गडाच्या मध्यभागी आई अंबाबाईचे मंदिर आहे.त्याच्यासमोरच गडावर दोन विहिरी आहेत. एक साखर विहीर तर दुसरी सात कमानी विहीर. या विहिरींची रचना अद्भुत आणि विलक्षण अशी आहे. पारंपारिक पद्धतीला छेद देऊन बनवलेल्या विहिरी सामानगडाचे भूषण आहेत. या विहिरी जांभा खडकात खोदलेल्या आहेत.  विहिरीच्या पायऱ्यांची लांबी साधारणता दहा फूट आहे.  उभ्या आणि आडव्या आकारात या पायऱ्यांची रचना केलेली आहे.  जसजसे पायऱ्या उतरत आत जावे तस तशा एकूण सात उभ्या कमानी आपल्याला दिसतात. विहिरीमध्ये खाली जाता जाता तापमानात कमालीचा गारवा निर्माण होतो. आजही या विहिरी भक्कम आहेत. http://Fort in Kolhapur Kille samangad in 2024

४) अंधार कोठडी

अंधार कोठडी जमिनीच्या भूगर्भात खोदलेल्या या कोठड्या खूपच भयावह आहेत. त्याकाळी राज कैद्यांना या कोठडीमध्ये ठेवले जायचे. भर उन्हातही येथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. या कोठड्या म्हणजे शिवकालीन स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे.

५) चोरखिंड

Fort in Kolhapur Kille samangad in 2024

 गडाच्या उत्तरेला खिंड स्थित आहे. शत्रूंना फसवण्यासाठी किंवा  अडचणीच्या वेळेत शत्रूंच्या हातावर तुरी देण्यासाठी या खिंडीचा वापर केला जात असे. गनिमी काव्याच्या हेतूने खिंडी ची निर्मिती करण्यात आली होती. चोरखिंड आजही भक्कम अवस्थेत आहे.  चोरखिंडी सोबतच गडाच्या भक्कम तटबंदीच्या मध्ये शत्रूला अचूक टिपण्यासाठी आयताकृती आकाराच्या खोबण्या तयार  केलेल्या आहेत. या खोबन्यामधून गडावरूनच गडाच्या पायथ्याशी असलेल्या शत्रूवर हल्ला करणे सोपे जात असे.

Kolhapur fort trekking

६) मारुती मंदिर

गडाच्या विरुद्ध बाजूस विस्तीर्ण पसरलेल्या पठारावर जुने मारुतीचे मंदिर आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती अत्यंत सुबक आणि देखणी आहे. मंदिराच्या आवारातील वातावरण खूप शांत आणि सुखद आहे. वडाची मोठी झाडे आणि त्यावर असणाऱ्या पक्षांचा किलबिलाट हवा हवा असा वाटतो.

७)  महादेव मंदिर

मारुती मंदिरापासून थोडे पुढे गेल्यावर जमिनीच्या अंतर्भागात अत्यंत सुबक असे महादेवाचे मंदिर आहे. याच ठिकाणी वनवास काळात राम,सीता व लक्ष्मण यांचे वास्तव्य असल्याचे पुरावे आहेत. मंदिरा मधील महादेवाची पिंड प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या वरील बाजूस प्रभूरामाचे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात संत ज्ञानेश्वर महाराज, बारा ज्योतिर्लिंग, श्री दत्त मंदिर आहे. मंदिराच्या मागील बाजूस प्रभू श्रीराम व सीता यांचा  शयन कक्ष आहे.

सामानगडाची सद्यस्थिती

सामानगड खूप प्रेक्षणीय आहे पण पर्यटनाच्या दृष्टीने सुधारणेस खूप वाव आहे.  “क” वर्ग पर्यटन स्थळात सामानगडाचा समावेश आहे. दुर्गवीर प्रतिष्ठान आणि लोकांच्या सहकार्याने येथे अनेक उपयोगी कार्यक्रम राबवत असते. त्यांच्या कामामुळे सामानगडाच्या ऐतिहासिक कालखंडाला न्याय मिळत आहे. पण ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्नांची गरज आहे.

गडावर कसे पोहोचाल?

गडावर पोचण्यासाठी टू व्हीलर किंवा फोर व्हीलर घेऊन जाता येते. कोल्हापूर पासून गडहिंग्लज साठी कायम बस उपलब्ध आहेत. तिथून आठ किलोमीटर अंतरावर सामानगड आहे. गडहिंग्लज मधून भडगांव मार्गे किंवा चन्नेकुपी मार्गे गडावर जाता येते. बेळगाव पासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावर सामानगड आहे. बेळगाव कडून येताना संकेश्वरला उतरावे लागते.  येथूनच गडहिंग्लज मार्गे सामानगडला जाता येते. चंदगड कडूनही सामानगडावर येता येते.Top 9 places to visit in Goa, beyond beaches.

खाण्यापिण्याची उपलब्धता

गडावर खाद्यपदार्थाची उपलब्धता नाही. गडाच्या बाहेरील बाजूस भेलपुरी व पाणीपुरीचा गाडा सोडल्यास बाकी खाद्य सामग्री उपलब्ध नाही. गडावर पिण्यायोग्य पाणी नाही. गडावर जाताना सोबत पाणी घेऊन जाणे आवश्यक आहे. तसेच गडावर  निवासाची देखील व्यवस्था नाही. जवळच असलेल्या तालुक्याचे ठिकाण गडहिंग्लजमध्ये आपल्याला राहता येईल.

 तर मित्रांनो ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या गडकोटांना भेटी देणे त्यांचा इतिहास जाणून घेणे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे.  तर एक वेळ सामान गडाला अवश्य भेट द्या..!!