१८ वर्षीय गुकेश बनला बुद्धीबळाचा नवा बादशहा..(New world chess champion in 2024)

भारताच्या बुद्धिबळातल्या वर्चस्वावर शिक्कामोर्तब

बुद्धिबळ या खेळातून भारतासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केवळ १८ वर्षीय ग्रँड मास्टर डी. गुकेष याने बुद्धिबळ या खेळाचे विश्व विजेतेपद मिळवण्याची कामगिरी केली आहे. ( New world chess champion in 2024) त्याआधी भारताकडून केवळ विश्वनाथन आनंद यांनी ११ वर्षापूर्वी अशी कामगिरी केली होती. या कामगिरीमुळे गुकेश चे फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून विशेष कौतुक होत आहे. बुद्धिबळ चे विश्वविजेतेपद मिळवणारा तो सगळ्यात कमी वयाचा खेळाडू बनला आहे. चीन च्या डिंग लिरेन याला पराभूत करत गुकेश ने विश्व विजेतेपदाचा मान मिळवला. विश्व विजेतेपदाची लढत सिंगापूर मध्ये झाली. त्यामध्ये दोघांनी मिळून १४ गेम खेळले. प्रत्येक गेम साठी एक पॉइंट असतो. जर सामना बरोबरीत सुटला तर अर्धा अर्धा पॉइंट वाटून दिला जातो. १३ गेम नंतर दोघेही प्रतिस्पर्धी साडेसहा गुणांसह बरोबरीत होते. १४ व्या गेम मध्ये मात्र गुकेश ने विजय मिळवत एक गुणाच्या आघाडीसह विजेतेपद मिळविले. त्यामुळे तामिळनाडू आणि संपूर्ण भारतात आनंदाची लहर पसरली आहे. New world chess champion 2024

ग्रँडमास्टर डी गुकेश

गुकेश चे बालपण आणि मस्ती:

Sports, Sports in india

चेन्नई मध्ये राहणाऱ्या गुकेश च्या वडिलांचे नाव हे रजनीकांत असून आईचे नाव पद्मकुमारी असे आहे. रजनीकांत हे डॉक्टर असून ते कान, नाक आणि घसा (ENT)तज्ञ आहेत तर त्याची आई ही शिक्षिका आहे. त्या मद्रास मेडिकल कॉलेज मध्ये शिकवतात. गुकेश चा जन्म २९ मे २००६ रोजी झाला. तो सद्या केवळ १८ वर्षाचा आहे. वयाच्या केवळ ७ व्या वर्षी त्याला बुद्धिबळ या खेळाची आवड निर्माण झाली. तो दिवसातून केवळ एक तास आणि आठवड्यातून ३ दिवस बुद्धिबळ खेळत असे. त्यानंतर तो वेगवेगळ्या स्पर्धा मध्ये खेळायला लागला. त्याची खेळातील प्रगती पाहून त्याच्या शिक्षकांनी त्याला प्रोत्साहन दिले. 

बुद्धिबळ या खेळासोबत तो अभ्यासातही हुशार आहे. त्याचे वडील रजनीकांत सांगतात, तो बाहेरून खूप साधा, सरळ दिसतो पण तो खऱ्या आयुष्यात तसा नाही. तो खूप खोडकर आहे. पण खेळाच्या वेळी त्याचे फक्त खेळावर लक्ष असते. रजनीकांत अभिमानाने सांगतात की सामना असते वेळी तो प्रशिक्षक सोडून कुणाशी बोलत नाही. आणि कुणाला बोलू ही देत नाही. त्याचे खेळावरून लक्ष विचलित होईल असे वर्तन त्याला नको असते. 

गुकेश चे वडील रजनीकांत यांचा संघर्ष:

Chess, Gukesh

मुलाची खेळातील प्रगती पाहून त्याच्या खेळावर लक्ष्य देण्यासाठी रजनीकांत यांनी त्यांचं काम बंद केलं आहे. लहान वयात गुकेश स्पर्धेमध्ये खेळायला लागला. तेव्हापासून त्याचे वडील त्याला वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये घेऊन जातात. या स्पर्धा वेगवेगळ्या शहरात तर कधी कधी विदेशात सुद्धा असतात. (New world chess champion in 2024)

घरात बुद्धिबळ या खेळात फारसा रस कुणालाच नाही. लहानपणी केवळ छंद म्हणून तो बुद्धिबळ खेळत असे. त्यामुळे त्याची खेळातील चाली आणि अंमलबजावणी बाबत ओळख व्हायला सुरुवात झाली. रजनीकांत यांचं काम संपायला उशीर व्हायचा. त्यामुळे शाळा सुटल्यावर तो एकटा राहू नये म्हणून त्यांनी त्याला बुद्धिबळ खेळाच्या शिकवणीला घातले होते. काही दिवसातच तो या खेळामध्ये पारंगत झाला. त्यामुळे त्याच्यातील चुणूक ओळखून त्याच्या प्रशिक्षकांनी 

गुकेश ला विशेष सरावासाठी बाहेर पाठवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांचे लक्ष वळवले. गुकेश हळू हळू पारंगत व्हायला लागला तसा त्याने या खेळासाठी विशेष वेळ द्यायला सर्वात केली. त्याची प्रगती पाहून शाळे नेही त्याला कधी आडकाठी केली नाही. आठवड्याच्या शेवटी किंवा सुट्टीच्या दिवशी तो विविध स्पर्धा खेळू लागला. बक्षिसे मिळवू लागला. त्याला बक्षीस मिळाले की त्याची शाळा त्याला प्रेरणा मिळावी म्हणून व्यासपिठावर सत्कार करायची.

डी गुकेश च आजपर्यंत मिळवलेले यश:

New world chess champion

गुकेश च वय जरी लहान असलं तरी त्याच्या पेक्षा मोठ्या स्पर्धकांना तो सहज हरवू लागला. अवघ्या ९ वर्षाचा असताना २०१५ साली त्याने गोवा येथे राष्ट्रीय शालेय विजेतेपद मिळवले होते. आणि त्यानंतर ची सलग तीन वर्षे तो विजेता होता. मॅग्नस कार्लसन हे एक मोठे आणि प्रसिद्ध नाव आहे. २०२३ मध्ये गुकेश ने त्याला हरवण्याची किमया केली होती. कॉमनवेल्थ चेस चॅम्पियन शिप त्याने २०१६ साली जिंकली त्यानंतर २०१७ मध्ये त्याला पहिल्यांदा FIDE च रेटिंग मिळाले. FIDE म्हणजे इंटरनॅशनल चेस फेडरेशन.वयाच्या १२ वर्षी २०१८ मध्ये त्याने वर्ल्ड युथ चेस चॅम्पियन शिप जिंकली. ग्रँडमास्टर बनण्याच त्याच स्वप्न २०१९ मध्ये पूर्ण झालं. ग्रँड मास्टर बनणारा गुकेश हा सर्वात युवा भारतीय होता तसेच तो जागतिक दुसरा युवा बुद्धिबळ खेळाडू होता. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलं नाही. २०२१ मध्ये त्याने युरोपियन क्लब कप जिंकला, या स्पर्धेत त्याने मॅग्नस कार्लसन शी थेट सामना केला. आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक मिळवलेल्या संघात त्याचा समावेश होता. हे पदक २०२२ मध्ये मिळाले होते. त्यानंतर २०२३ च्या चेस वर्ल्ड कप मध्ये त्याने उपांत्य पूर्व फेरीत प्रवेश केला होता पण त्याला तिथे मॅग्नस कार्लसन कडून पराभव पत्करावा लागला. २०२३ मध्ये तो भारताचा अधिकृत रीत्या नंबर १ चा बुद्धिबळ खेळाडू बनला. त्याने विश्वनाथन आनंद ला मागे टाकले. जवळपास ३७ वर्षाची आनंद ची सत्ता त्याने पालटली होती. हे त्याचं सर्वात मोठ यश होत. २०२४ च्या शेवटी चेन्नई मध्ये झालेली स्पर्धा गुकेश ने जिंकली आणि त्याने कँडिडेट्स स्पर्धेत स्थान निश्चित केले. ही स्पर्धा जिंकून त्याने विश्विजेतेपद स्पर्धेत प्रवेश केला. यावेळी त्याने भारतातील अजून दोन स्टार खेळाडू विदित गुजराती आणि प्रज्ञानंदला हरवलं होतं. SMAT 2024-25गेली ३ ते ४ वर्षे भारतीय खेळाडूंनी अनेक स्पर्धा गाजवल्या यामध्ये डी गुकेश, विदित आणि प्रज्ञानंद यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. हे सर्व एकमेकांचे प्रतिस्पर्धी असले तरी यांच्या मैत्रीपूर्ण संबंध आहेत. स्पर्धेनंतर ते सर्व एकत्र वेळ घालवतात. पण परस्परविरोधी खेळताना ते एकमेकांची हयगय करत नाहीत.

कँडिडेट्स स्पर्धेत गुकेशचं आणि भारतीय खेळाडूंचा यश:

वरील तिन्ही युवा खेळाडूंनी कॅनडाच्या टोरांटोमध्ये 3 ते 22 एप्रिलदरम्यान खेळवण्यात आलेल्या 

Generic medicine information in 2024

कँडिडेट्स स्पर्धेत भाग घेतला. ही एक प्रतिथयश स्पर्धा असते. जगातील आघाडीच्या खेळाडू मध्ये ही स्पर्धा होते व यातील विजेत्याला जगज्जेतेपदाच्या लढतीत विद्यमान विजेत्याशी लढण्याची संधी मिळते. विशेष म्हणजे ही स्पर्धा गुकेश ने जिंकली आणि जगज्जेते पदासाठी त्याचा मार्ग मोकळा झाला. या आठ आघाडीच्या खेळाडूंमध्ये तीन भारतीय खेळाडू होते ही विशेष बाब होती. 

Second indian chess world champion

बुद्धिबळ आणि भारत सद्यस्थिती:

२०२२ मध्ये चेस ऑलिम्पियाड ही स्पर्धा भारतात भरवण्यात आली. भारत देश हा यजमान या नात्याने तीन संघ खेळवू शकला. याचा विशेष फायदा युवा खेळाडूंना झाला. गुकेश आणि प्रज्ञानंद यांचे रेटिंग कमी असल्याने ते मुख्य संघात खेळू शकले नाहीत. ते संघ दोन यामध्ये खेळले. पण त्यावेळी मॅग्नस ार्लसन म्हणाला होता, की ही युवा खेळाडूंची टीम प्रमुख संघापेक्षा छान आणि संतुलित आहे. या स्पर्धेत या युवा खेळाडूंनी आपली छाप सोडली. त्याशिवाय विदित गुजराती, अर्जुन एरिगसी, निहाल सरीन हे सर्व युवा खेळाडू भारतीय बुद्धिबळ संघाला भविष्यात योग्य उंचीवर घेऊन जातील अशी आशा आहे. Fort in Kolhapur Kille samangad in 2024- (सामानगड )

भारताचे दिग्गज बुद्धिबळपटू ग्रँड मास्टर प्रवीण ठिपसे यांनी मागच्या वर्षी 2023 मध्ये एक लेख लिहला होता. त्यांनी लीहलेल्या या लेखात ते म्हणाले होते की, प्रज्ञानंद किंवा डी गुकेश या दोघांपैकी एकजण किंवा दोघंही वर्ल्ड चॅम्पियन म्हणजे जगज्जेते होऊ शकतात. प्रवीण ठिपसे यांचे हे आधी केलेलं भाकीत खर ठरलं असून पुढील काही वर्षे तरी भारतीय खेळाडूंचा बुद्धिबळ या खेळामध्ये दबदबा पाहायला मिळाला तर नवल वाटू नये.