Rajastan:- Art and Culture
Rajastan (राजस्थान)
आजपासून आपण आपल्या या चॅनेलवर संपूर्ण भारताची सफर करणार आहोत. मला आशा आहे ही शब्दरुपी सफर तुम्हाला खूप आवडेल. (Rajasthan:- Art and Culture)आज आपण अशा राज्याविषई लिहनार आहोत ज्याला भारतातील सर्वात सुंदर राज्य म्हणून ओळखले जात,ज्याची कला आणि संस्कृती संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे, सर्वात जास्त डेस्टिनेशन वेडिंग या राज्यामध्ये केली जातात, भारतातील सर्वात मोठे वाळवंट या राज्यातच आहे, असं राज्य जिथे जगभरातून लोक उंट सफारीसाठी येतात, येथील मोठमोठे महाल आणि ऐतिहासिक किल्ले या राज्याला खूप खास बनवतात, येथील लोकांची संस्कृती, कला, राहणीमान हे इतर राज्यातील लोकांपेक्षा खूप वेगळे आणि खास आहे, येथील लोक त्यांच्या पोशाखासाठी सुद्धा विशेष ओळखले जातात. एक अस राज्य ज्याच्या कला आणि संस्कृतीमुळे भारताला जगभरात एक विशेष ओळख प्राप्त झालेली आहे.आज आपण लिहणार आहोत भारतातील खूप सुंदर आणि ऐतिहासिक राज्य “राजस्थान” बाबत.
या राज्याला राजा – महाराजांचं राज्य म्हणून ओळखले जात. कारण आजही अनेक मोठमोठे आणि सुंदर किल्ले राजस्थान च्या वैभवाची साक्ष देत उभे आहेत. राजस्थान म्हटलं की आपल्यासमोर येत ते थार वाळवंट, उंटाची सवारी, मोठमोठे महाल, घुमर आणि काल बैलिया नाच. राजस्थान ची निर्मिती ३० मार्च १९४९ ला झाली. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील मोठे राज्य असून त्याच्या सीमा गुजरात, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि पंजाब या राज्यांना लागून आहेत. राजस्थान फक्त क्षेत्रफळानुसार भारतातील मोठ राज्य नाही तर राज्यस्थान मधील जैसलमेर हा जिल्हा ही सर्वात मोठा आहे. राजस्थानची राजधानी जयपूर हे शहर आहे त्याची स्थापना राजा जयसिंग द्वितीय, यांनी 1727 मध्ये केली. राजस्थानला रंगांचा राज्य असे देखील ओळखले जाते कारण येथील बहुतांश शहरांना रंगांशी जोडलं जातं जसं की जयपूर ला गुलाबी शहर म्हणून ओळखतात. त्याचप्रमाणे जोधपुरला निळा, उदयपूरला पांढरा रंगावरून ओळखले जाते.
राजस्थान आणि वाळवंट याचं एक वेगळ नात आहे. राजस्थानामधील “थार” वाळवंट हे भारतातील सर्वात मोठे आहे. थार वाळवंटालाच “The Great Indian Desert” म्हणून ओळखले जाते. या वाळवंटाचा जवळपास 60 टक्के हिस्सा राजस्थानमध्ये आहे. तर उर्वरित हिस्सा गुजरात, पंजाब आणि हरियाणा मध्ये पसरलेला आहे. परदेशी पर्यटक सध्या राजस्थान कडे खूप आकर्षित होत आहेत. राजस्थान मधील जयपुर या शहराला “पिंक सिटी” म्हणून ओळखले जाते. गुलाबी रंग हा पर्यटकांच्या स्वागत आणि आदरातिथ्या साठी ओळखला जातो. जयपूरच्या गुलाबी शहर अशा नामकरणाच्या पाठीमागे ही एक मोठा इतिहास आहे. सन 1876 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स यांनी जयपूर ला भेट दिली त्यावेळी राजा जयसिंग यांनी पूर्ण शहराला गुलाबी कलर मध्ये रंगवले होते. जयपूर हे पूर्ण भारतातील सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. फक्त जयपुरच नव्हे पूर्ण राजस्थानमध्ये अपराधची संख्या खूप कमी आहे. Rajastan:- Art and Culture
राजस्थान ला वीरांची भूमी म्हणून ओळखले जाते. महाराणा प्रताप सारख्या शूर योध्यानी राजस्थान मध्येच जन्म घेतला होता. त्यांनी कधीच कोणासमोर हार मानली नाही आणि सर्व विदेशी शक्तीचा जोरदार मुकाबला केला. राजस्थान त्याच्या वैशिष्ट्य पूर्ण नृत्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. तेथे ८ प्रकारची नृत्ये केली जातात. यामध्ये कालबेलिया हा प्रसिद्ध नृत्यप्रकार आहे. या नृत्यमध्ये पुरुष बासरी वाजवत असतात तर त्या बासरी च्या संगितावर महिला नृत्य करताना दिसतात.
राजस्थानी लोकांचा पोशाख आणि संस्कृती यांना एक वेगळं महत्त्व आहे. येथील पुरुष पगडी वापरतात त्याचसोबत मोठ्या मोठ्या मिशा हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जयपूर मधील राम सिंह हे जगातील सर्वात मोठ्या मिशा असणारे व्यक्ती आहेत तर सर्वात मोठी पगडी घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड पण राजस्थान मधील आहे. येथील महिला सुद्धा वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतात. युनेस्को च्या वारसा स्तळात राजस्थान मधील अनेक वास्तूंचा समावेश आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या राजस्थानात महाराष्ट्र पाठोपाठ सर्वाधिक किल्ले आहेत. राजस्थान मध्ये जवळपास ४५ किल्ले आहेत. http://Shaktipeet express way चित्तोड गड हा राजस्थान मधील सर्वात अप्रतिम आणि मोठा किल्ला आहे.
राजस्थानी लोक आपल्या खानपान साठी खूप महत्व देतात. राजस्थान मधील बहुतांश लोक शाकाहारी आहेत. येथे गोड पदार्थाना खूप महत्त्व दिले जाते. त्याचसोबत मद्य विक्री येथे अत्यल्प प्रमाणात होते. येथील मसाले सुप्रसिद्ध आहेत. उदयपूर स्तिथ चहा आणि मसाला बाजार प्रसिद्ध आहे. राजस्थान तेथे बनवण्यात येणाऱ्या दागिने यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. हाताने बनवलेल्या वस्तूंचे खूप मोठे मार्केट येथे उपलब्ध आहे. येथे सोने आणि चांदीचे उच्च प्रतीचे दागिने तुम्ही खरेदी करू शकता.
राजस्थान हे खास करून त्याच्या मंदिरासाठी देखील प्रसिद्ध आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या प्रत्येक मंदिरामागे एक गोष्ट लपलेली आहे. राजस्थान मध्ये “बुलेट बाबा” मंदिर आहे. येथे बुलेट बाईक ची पूजा केली जाते. जगभरातून हजारो बाईक रायडर्स या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. तर राजस्थान मध्ये चालणारी रेल्वे “पॅलेस ऑन व्हील्स” हि जगतील सर्वोत्तम अशी सेवा पुरवणारी रेल्वे म्हणून ओळखली जाते. या रेल्वेची सुरुवात 26 जानेवारी 1982 रोजी करण्यात आली. राजस्थानमध्ये एक थंड हवेचे ठिकाण “माउंट अबू” अरवली पर्वतरांगेमध्ये स्थित आहे. माउंट आबू त्याच्या तलाव, झरे,आणि हिरव्यागार जंगलासाठी पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आपणा सर्वांना पोखरण टेस्ट बद्दल माहिती असेलच. ही चाचणी राजस्थान मधील जैसलमेर येथेच करण्यात आली होती. जैसलमेर जिल्ह्यातील पोखरण येथे ही परमाणु चाचणी करण्यात आली होती. ही चाचणी 1974 मध्ये करण्यात आले होती. Generic medicine information in 2024
Facts about rajastan:- (राजस्थान बाबत काही रोचक तथ्य)
१) राजस्थानी लोक सोडले तर बाकीच्या जगाला वाटते की राजस्थानात पाणी नाही आणि इथे रक्त स्वस्त आणि पाणी महाग, पण येथे सर्वात शुद्ध पाणी जमिनीत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.
२) राजस्थानचे लोक संपूर्ण जगात सर्वात मोठे कंजूष पण दयाळू मानले जातात. भारतातील सर्वात मोठे उद्योगपतींपैकी ९५% राजस्थानचे आहेत, तर राम मंदिरासाठी सर्वाधिक पैसा राजस्थानचा आहे…
राम मंदिराच्या उभारणीत वापरलेला दगडही राजस्थानचाच..!
३) हे लोक कांदे-मिरची घालून रोटी खातात…
संपूर्ण जगातील सर्वोत्तम आणि शुद्ध अन्न ही राजस्थानची परंपरा आहे. संपूर्ण जगात राजस्थानमध्ये देशी तुपाचा सर्वाधिक वापर होतो. येथील बाजरीला जगातील सर्वात पौष्टिक धान्याचा मान मिळाला आहे..!
४) राजस्थानी लोक सोडले तर उर्वरित जगाला वाटते की राजस्थानी लोक छतावर आणि झोपड्यांमध्ये राहतात, त्यांना कायमस्वरूपी घरांची कमी माहिती आहे पण
इथले किल्ले, इमारती आणि अप्रतिम कोरीव काम जगात कुठेही नाही. येथील अजेय किल्ले आणि वाड्या हजारो वर्ष जुन्या आहेत. मकरानाचा संगमरवर, जोधपूरचा दगड आणि जैसलमेरचा दगड आपल्या अनोख्या सौंदर्यामुळे जगप्रसिद्ध!
राजस्थानमध्ये जशी चीनची भिंत आहे, तशीच त्याहूनही मजबूत भिंत आहे, ज्याची जगात ओळख नाही..!
५) बाकीच्या जगाला वाटते की राजस्थानी लोकांशिवाय राजस्थानात काहीच नाही. इथे पेट्रोलियमचा अमर्याद साठा तसेच वायूंचा अमर्याद साठा आहे त्याचसोबत
इथे कोळशाचा भरपूर साठा आहे.
६)एकट्या राजस्थानात मधल्या महिलांजवळ सोनं जमवलं तर बाकीच्या भारतातील महिलांपेक्षा जास्त सोनं असेल.
राजस्थानच्या जोधपूरमध्येही सर्वाधिक सोन्याची विक्री केली जाते.
७)राजस्थान म्हणजे वाळवंट अस आपण म्हणतो पण
राजस्थानमध्ये अनेक तलाव, धबधबे आणि अरवली पर्वत असून रणथंभोर पर्वत शिखर हे जगातील सर्वोच्च पर्यटन महल आहे. शिवाय राजस्थानमधील सरोवरातील मीठ भारतात 80% मीठ पुरवते जे 100% शुद्ध नैसर्गिक मीठ आहे.
८)तसेच जगाला माहीत नसलेल्या अनेक गोष्टी आहेत चुकीचे शैक्षणिक धोरण, राजस्थानचे नकारात्मक चारित्र्य जे जगभरात खरे मानले जाते
९)इथे राजस्थानची वाळूची माती पूनवेच्या रात्री कुंदनसारखी चमकते. या पर्वतांमुळे त्याला ‘मरुधारा‘ म्हणतात.
राजस्थानचा इतिहास अभिमानास्पद आहे आणि येथील जीवन सर्वात शुद्ध आहे. प्रत्येक गोष्ट आदरणीय आहे आणि इतिहासात नोंदवलेल्या कथांवर गाव-गाव उभे आहे.
Why is Rajasthan special? (राजस्थान खास का आहे?)
१. भारतातील 100 सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी 35 राजस्थानी व्यापारी आहेत.
२. आजवर दंगलीत हजारो लोक मारले गेले पण राजस्थानात एकही नाही.
३. केरळ, आंध्र प्रदेश आणि गुजरात सुद्धा देऊ शकत नाहीत इतके सैनिक एकट्या राजस्थानने देशाला दिले.
४. कर्नल सुभेदार हे राजस्थानचे आहेत.
५. उच्च शिक्षण संस्थांमध्ये इतके राजस्थानी आहेत की महाराष्ट्र आणि गुजरात त्याची बरोबरी देखील करू शकत नाहीत.
६. राजस्थान हे एकमेव राज्य आहे जिथे इतर राज्यांमध्ये मीडियामध्ये दाखवल्याप्रमाणे शेतीच्या कारणामुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत.
७. आजही सर्वाधिक संयुक्त कुटुंबे राजस्थानमध्ये राहतात…!!
८)पाहुण्याला अजूनही देवाप्रमाणेच स्थान दिले जाते
आणि येथे पाहुणचारात कोणतीही कसर सोडली जात नाही.
जय भारत…..
जय राजस्थान…..
माझा प्रिय राजस्थान
माझा रंगीबेरंगी राजस्थान
जर ताजमहाल हे प्रेमाचे लक्षण आहे.
तर ‘गड चित्तोड’ ही सिंहाची कथा आहे.
“काही लोक हरूनही जिंकतात!
काही लोक जिंकूनही हरतात!!
अकबराच्या खुणा इथे कुठेच दिसत नाहीत. पण
“राणाचे घोडे आजही प्रत्येक चौकात दिसतात.
___” जय जय राजस्थान “______
#राजस्थान#