Top 10 places to visit in kolhapur (कोल्हापूर शहरातील १० प्रेक्षणीय स्थळे)

कोल्हापूर एक ऐतिहासिक शहर, महाराष्ट्राची दुसरी राजगादी, निसर्ग समृध्द, सुबल, सफल असा महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे. पंचगंगेच्या तीरावर आणि सह्याद्रीच्या खुशीत वसलेले महाराष्ट्रातील अती दक्षिणेकडील असलेले हे शहर दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते. कोल्हापूर ला पूर्वी कलापुर या नावाने ओळखले जायचे त्यानंतर त्याचे नामकरण करवीर असे झाले. कोल्हापूर हे सूती कपडासाठी प्रसिद्ध आहे त्याचबरोबर मनमुराद तांबडा पांढरा, गरम कटाची मिसळ, कुस्ती चे माहेरघर, गुळाची खाण, कोल्हापुरी चपलाची बाजारपेठ या सगळ्या तून एक वेगळेपण कोल्हापूर ने जपलय. http://Top 10 places to visit in kolhapurकोल्हापूरची जशी भाषा रांगडी तसे लोकही रांगडे. तोंडात शिवी पण हृदयात ठासून भरलेले प्रेम ही इथल्या लोकांची ओळख. कोल्हापूर ला खूप मोठी इतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. अनेक प्रसिद्ध गडकोट याच जिल्ह्यात आहेत. आज आपण या लेखात कोल्हापुरातील १० प्रसिद्ध पर्यटन स्थळांची माहिती घेऊयात.

१) महालक्ष्मी मंदिर (Mahalaxmi Temple)

हे कोल्हापुरात येणाऱ्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षणाचे केंद्र आहे. कोल्हापूर शहरामध्ये असणारे महालक्ष्मी मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरापैकी एक आहे.  करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी एक मंदिर आहे.  हे एक प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र आहे.  दरवर्षी लाखो लोक या मंदिराला भेट देतात.  नवरात्र उत्सवामध्ये हे मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळले जाते.  महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रसिद्ध श्रद्धास्थान यापैकी एक महिने मंदिर ओळखले जाते.  आजही प्रत्येक कोल्हापूरकर श्रीदेवी अंबाबाई ची मनोभावे पूजा अर्चा करतो.  देवी अंबाबाईचा वरदस्त कायमच कोल्हापूर आणि कोल्हापूर आणि कोल्हापूरकर लोकांवर आहे.  कोल्हापूरला आल्यावर त्या मंदिराला भेट  दिल्याशिवाय कोल्हापूरची सहल साध्य होऊ शकत नाही.  कोल्हापूर बस स्थानकापासून श्रीदेवी अंबाबाईचे मंदिर फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे

२) भवानी मंडप (Bhavani mandap)

Top 10 Places To Visit In Kolhapur

ऐतिहासिक वास्तुकलेचा एक नमुना म्हणून भवानी मंडप प्रसिद्ध आहे. भवानी मंडप हे कोल्हापुरातील सर्वात जुनी आणि प्रसिद्ध अशी वास्तू आहे. पूर्वी छत्रपती शाहू महाराजांचा दरबार येथे भरला जात असे.  तसेच भवानी मंडप हा पूर्वीचा राजवाडा म्हणून ओळखला जातो.  भवानी मंडप हा पूर्णपणे काळ्या दगडात बांधलेला आहे.  ही इमारत शहरातील महत्त्वाच्या हेरिटेज इमारतीपैकी एक आहे.  भवानी मंडपाचे रूपांतर सार्वजनिक स्मारकात करण्यात आलेले आहे.  या मंडपाच्या आत मध्ये अनेक पुतळे,  भरलेले प्राणी, मुकुट आणि लाकडी शिल्पे पाहण्यास मिळतात.  भवानी मंडप हा पाहण्यासाठी सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत खुला असतो.  कोल्हापूर बस स्थानकापासून भवानी मंडप सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे.  येथे जाण्यासाठी कोल्हापूर बस स्थानकापासून  बसची सुविधा पुरवण्यात आलेली आहे. Top 9 places to visit in Goa, beyond beaches.

3) शालिनी पॅलेस (Shalini palace)

शालिनी पॅलेस ही कोल्हापूरची शान आहे.  कोल्हापूर शहरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक  ठिकाणांपैकी एक म्हणून शालिनी पॅलेस ओळखले जाते.  कोल्हापूर संस्थानाच्या राजकन्या शालिनी राजे यांच्यासाठी शालिनी पॅलेस ची निर्मिती करण्यात आली होती.  हा राजवाडा एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला बांधण्यात आला होता.  हा राजवाडा आयताकृती आकारामध्ये बांधण्यात आलेला आहे.  ही वास्तू मध्ययुगीन काळातील आहे.  हा वाडा दुमजली असून याच्या चारी कोपऱ्यात चार मनोरे उभे करण्यात आलेले आहेत. या चारही मनोऱ्यावर घुमट उभे करण्यात आलेले आहेत.  यावर शोभिवंत काचेचे नक्षीकाम करण्यात आलेले असून त्यांच्या मध्यभागी काचेचे घड्याळ लावण्यात आलेले आहे.  काचेच्या नक्षीकामामुळे राजवाड्याच्या सौंदर्यात खूपच भर पडली आहे.  या राजवाड्याच्या आतील बाजूस अनेक दालने असून ती अत्यंत  उत्कृष्ट रित्या सजवण्यात आलेली आहेत.  कोल्हापूर बस स्थानकापासून शालिनी पॅलेस हे ठिकाण साडेचार किलोमीटर अंतरावर आहे.  जर तुम्ही कोल्हापूरला गेलात तर शालिनी पॅलेस ला एक वेळ अवश्य भेट द्या.

४) कणेरी मठ (Kaneri math)

हे ठिकाण कोल्हापूर पासून 13 किलोमीटर अंतरावर आहे. कनेरी मठ हे कोल्हापुरातील सर्वात सुंदर आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे.  यालाच सिद्धगिरी ग्रामजीवन संग्रहालय म्हणून ओळखले जाते.  याची निर्मिती सात एकर परिसरामध्ये करण्यात आलेली आहे.  येथे भगवान शिवाचे मंदिर असलेले पवित्र स्थान म्हणून ओळखले जाते.  या मंदिराला भेट देण्यासाठी बरेचसे पर्यटक कायम येत जात असतात .  चहुबाजूनी  निसर्गाने वेढलेल्या कनेरी मठामध्ये प्राचीन ग्रामीण जीवनावर पैलू पाडण्यात आलेला आहे.  येथे प्राचीन ग्रामीण जीवन दाखवणारे जवळपास 80 ते 90 दृश्ये आहेत  तसेच जवळपास 200 ते 300 पुतळे आहेत.  या ठिकाणाला सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत कधीही भेट देऊ शकता.

५)  खासबाग मैदान (Khasbag maidan)

कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी म्हणून ओळखली जाते.  आतापर्यंत अनेक नामवंत पैलवान कोल्हापूरने दिलेली आहेत.  कुस्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या खासबाग मैदानाची निर्मिती शाहू महाराज यांनी केली.  हे मैदान बांधण्याची सुरुवात 1907 मध्ये करण्यात आली होती तर 1912   मध्ये या मैदानाचे पूर्ण काम झालेले होते.  जवळपास 30000 लोक एका या मैदानातून कुस्ती पाहू शकतात.  कुस्ती व्यवस्थित रित्या सर्वांना पाहता यावी यासाठी या मैदानाची बैठक व्यवस्था उतरणीवर आहे.  आजही या मैदानावर अनेक नामवंत आणि प्रतिष्ठित कुस्त्या होतात.  खासबाग मैदान कोल्हापूर बस स्थानकापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावर आहे.

६) रंकाळा तलाव ( Rankala lake)

Top 10 Places To Visit In Kolhapur

कोल्हापूरचे वैभव असलेला हा तलाव आहे. रंकाळा हे कोल्हापुरातील अतिरम्य  आणि आकर्षक ठिकाणांपैकी एक आहे.  यालाच रंकाळा चौपाटी असेही ओळखले जाते.  येथे दररोज सकाळी आणि संध्याकाळी पर्यटकांची खूप गर्दी असते.  ह्या तलावाची निर्मिती कोल्हापूरचे राजे शाहू छत्रपती यांनी केली होती.   ह्या तलावाची निर्मिती जवळपास १०७ हेक्टर मध्ये करण्यात आलेले आहे.  येथे असंख्य कोल्हापूरकर दररोज फिरण्यासाठी व आराम करण्यासाठी येत असतात.  रंकाळा चौपाटी परिसरात अनेक खाद्यपदार्थ कमी किंमतीत मिळतात.  येथे खवय्यांची कायम गर्दी होत राहते.  येथे भेट देण्यासाठी वर्षभरातील कोणताही काळ अनुकूल आहे.  कोल्हापूरचे वैभव असला हा रंकाळा कोल्हापूर बस स्थानकापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर आहे.

७) न्यू पॅलेस म्युझियम (New palace museum)

न्यू पॅलेस म्युझियम ही कोल्हापूर शहरातील एक प्राचीन इमारत आहे. येथे राजवाड्याच्या मध्यभागी घड्याळाचा मनोरा म्हणून ओळखला जाणारा एक अष्टकोनी मनोरा आहे.  हा मनोरा खूपच सुंदर आहे . न्यू पॅलेस येथे आजही राज्य घराण्याचे वास्तव्य आहे.  या राजवाड्याच्या तळमजल्यावर आजही छत्रपती शाहू महाराजांची छायाचित्रे,  नानी, दागदागिने, वेशभूषा, शस्त्रे पाहायला मिळतात. भवानी मंडप कसबा बावडा रोडवर हा पॅलेस स्थित आहे. मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत भेट देण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे.  कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण फक्त तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

८) डी वाय पी सिटी मॉल (D.Y.P City mall)

पुणे बेंगलोर महामार्गावर असलेला डी वाय पी सिटी मॉल हा कोल्हापुर  मध्ये भेट देण्यासाठी एक सर्वोत्कृष्ट ठिकाण आहे.  महाराष्ट्रातील एक अग्रगण्य शॉपिंग सेंटर म्हणून या मॉल ची ओळख आहे.  या मॉलमध्ये आपल्याला बजेट फ्रेंडली ते खूप प्रीमियम अशा गोष्टींची  शॉपिंग करता येते. Bee Farming – मधुमक्षिका पालनत्याचबरोबर या ठिकाणी अशी अनेक दुकाने आहेत जिथे आपण खेळणी, उपकरणे,  दागिने, खेळणे यांची खरेदी करू शकतो. त्याचबरोबर येथे   खवय्या साठी अनेक आकर्षक आणि जिभेचे चोचले पुरवणारे रेस्टॉरंट आहेत.  कोल्हापूर बस स्थानकापासून डी वाय पी सिटी मॉल हे ठिकाण केवळ एक पॉईंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

९) ड्रीम वर्ड वॉटर पार्क (Dream world water park)

 कोल्हापूर शहरातील ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क ही जागा त्याच्या रंगीबेरंगी कारंजासाठी प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत मस्त वेळ घालवण्यासाठी हे पार्क उत्तम आहे.  येथे आठ वेगवेगळ्या प्रकारच्या,  वेगवेगळ्या रंगाच्या स्लाइट्स उपलब्ध आहेत.  त्याचबरोबर आपल्या बजेटमध्ये येथे  कॅफे सुद्धा उपलब्ध आहे.  त्यामध्ये आपण वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.  या वॉटर पार्कला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मे हा कालावधी सर्वोत्कृष्ट आहे.  कोल्हापूर बस स्थानकापासून हे ठिकाण फक्त दोन पॉईंट सात किलोमीटर अंतरावर आहे

१०) कोल्हापूर मार्केट (Kolhapur market)

कोल्हापूरला आलेल्या प्रत्येक पर्यटकांनी कोल्हापूर मार्केटला खरेदीसाठी जाणे गरजेचे आहे.  येथे अनेक वस्तू अनेक खाद्यपदार्थ यांची खरेदी अत्यंत अल्प किमतीत करता येते.  कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी मसाले हे प्रत्येकाला हवे हवेसे वाटतात.  कोल्हापूर मार्केटमध्ये कोल्हापुरी चप्पल आपल्याला  मापक दरात मिळतात.  कोल्हापूरमध्ये येणारा प्रत्येक पर्यटक आवर्जून या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येत असतो.  कोल्हापूर बस स्थानकापासून कोल्हापूर मार्केट हे फक्त तीन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे.

ऐतिहासिक परंपरा असलेल्या कोल्हापूर ला भेट देणे, विविध पर्यटन स्थळांचा प्रवास करणे ती स्थळे आपल्या डोळ्यात आणि मनात साठवून ठेवणे यासारखा सुखद अनुभव नाही. जसं कोल्हापूर खूप सुंदर आहे तसेच येथील लोक पण प्रेमळ. बाहेरून आलेल्या लोकांवर प्रेम करावं ते फक्त कोल्हापूर करानीच. कोल्हापूर हे एकदम आपल्या खिशाला परवडणारे ठिकाण. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी तुम्ही इथ आलंच पाहिजे. जिथे सगळं पुरेपूर ते फक्त कोल्हापूर.