Top 9 places to visit in Goa, beyond beaches.

गोवा:-

गोवा,  भारतातील सगळ्यात छोटे,  पण पर्यटनाच्या दृष्टीने विकसित राज्य म्हणजे गोवा. आपल्या सर्वांच्या बकेट लिस्ट मध्ये गोव्याला भेट देणे असतेच असते.  स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, सुंदर सुंदर चर्च,  नाईट लाईफ  यांची  भुरळ लोकांना पडल्याशिवाय राहत नाही.  हजारो लोक दरवर्षी गोव्यात  फिरण्यासाठी येतात.  यामध्ये भारतासोबतच  परदेशी पर्यटकांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे.( Goa tourism ) गोव्यामध्ये फिरण्यासाठी आणि भेट देण्यासाठी खूप सुंदर पर्यटन स्थळे आहेत. यामध्ये प्रामुख्याने बागा व कलंगुट बीच,  मीरा मार, दोना पावला बीच,  बोंडला प्राणी संग्रहालय पणजी,  मंगेशी,  सप्तकोटेश्वर मंदिर,  हरमल किंवा मोरजिम बीच यांचा समावेश होतो.  हजारो लोक याच ठिकाणांना भेट देतात आणि जातात. http://Top 9 places to visit in Goa, beyond beaches पण या व्यतिरिक्त अशी  बरीचशी ठिकाणे पाहण्यासारखे आहेत.  ही ठिकाणे सुद्धा खूप सुंदर असून गोव्यात आल्यानंतर एकदा तरी भेट देण्यासारखी आहेत.  आज आपण या लेखातून अशाच अपरिचित गोव्यातील ठिकाणांची माहिती घेणार आहोत. या अपरिचित ठीकानामध्ये प्रामुख्याने दिवार आयलँड, रईस मागोस  फोर्ट, फर्नांडिस हेरिटेज हाऊस, मापसा मार्केट, सलीम अली पक्षी अभयारण्य, सालोलीम डॅम, काबो दी रामा फोर्ट, तांबडी सुर्ला मंदिर, बिर्ला मंदिर यांचा समावेश होतो.

१) दिवार आयलँड:- (Divar island)

दिवार आयलँड  हे एक अप्रतिम छोटेसे बेट आहे.  पणजी पासून ८ ते १० किलोमीटर अंतरावर हे बेट आहे.  ह्या बेटा ला जाण्यासाठी रस्ता नाही.  त्यामुळे ह्या भेटायला भेट देण्यासाठी प्रवास करावा लागतो.  दिवार आयलँडला भेट देण्यासाठी  रिबांधर पासून फेरीबोट उपलब्ध आहेत.  ह्या आयलँडला गेल्यावर तुम्ही कुठेही  मनसोक्त पणे फिरू शकता.  या ठिकाणी तुम्हाला गुगल मॅप वगैरे लावायची काहीही गरज नाही.  येथे खूप सारी झाडी,  गोवन कौलारू घरे,  स्वच्छंद फिरणारे पक्षी,  आणि त्यामध्ये मस्त असणारे एक छोटेसे चर्च,  चहुबाजूनी पसरलेले स्वच्छ नितळ पाणी  हे सर्व पाहू शकता.  हे सर्व पाहून झाल्यावर  परत  फेरी बोटीतून तुम्ही पणजीला येऊ शकता.  ह्या फेरीबोटीचे  तुम्हाला कोणतेही शुक्ल द्यावे लागत नाही. Top 9 places to visit in Goa, beyond beaches.

2) रईस मागोस  फोर्ट:- (Reis magos fort)

तुम्ही म्हणाल गोव्यामध्ये किल्ले पण आहेत का?  तर याचे उत्तर हो असेच देता येईल. चापोरा, रईस मागोस फोर्ट, शिवगड असे काही प्रमुख किल्ले येथे आहेत. रईस मागोस फोर्ट हा सुंदर किल्ला पणजी पासून हाकेच्या अंतरावर आहे. या किल्ल्यावर काही काळ मराठ्यांचे राज्य होते.  ह्या किल्ल्याचे जतन खूप चांगल्या पद्धतीने केलेले आहे.  येथे तुम्हाला गोव्याचा एक हजार वर्षांपूर्वीचा पासून चा इतिहास वाचायला मिळतो.  समुद्राच्या कडेवर असलेला हा किल्ला खूप सुंदर असून गोव्यात आल्यावर भेट देण्यासारखा आहे

3)बिर्ला मंदिर:- (Birla Temple)

सध्या नव्याने बांधण्यात आलेले हे मंदिर असून हे मंदिर पाहण्यासारखे आहे.  गोवा एअरपोर्ट पासून जवळच हे मंदिर आहे.  शक्यतो संध्याकाळच्या वेळी या मंदिराला भेट देणे चांगले.  हे मंदिर खूप आकर्षक असून या मंदिरामध्ये राधाकृष्ण, राम सीता, गणपती यासारख्या देवतांच्या खूप सुंदर मूर्ती आहेत.  खूप मनमोहक अशी विद्युत  रोशनी या मंदिराला केलेली आहे.  या मंदिराला भेट देण्यासाठी कोणतीही फी आकारली जात नाही.  या मंदिराच्या मागे एक सुंदर बगीचा तयार करण्यात आलेला आहे.  विविध प्रकारची झाडे आणि कारंजे या बगीचा मध्ये आहेत.  हा बगीचा म्हणजे लहान मुलांसाठी एक पर्वणी आहे

Top 9 places to visit in Goa, beyond beaches.

४) फर्नांडिस हेरिटेज हाऊस :- (Fernandis heritage house)

हा स्पॉट चांदुर या गावात आहे.  सध्या जरी गोव्याची राजधानी पणजी असली तरी पणजीच्या आधी चांदूर ही गोव्याची राजधानी होती.  फर्नांडिस हेरिटेज हाऊस  हे सर्वांसाठी खुले असूनअल्प दरात तिकीट काढावे लागते.  हे एक 250 ते 300 वर्षाचे  जुने गोवन पद्धतीचे घर आहे.  हे संपूर्ण घर बघण्यासारखे आहे.  येथे खूप साऱ्या जुन्या वस्तू जतन करून ठेवलेले आहेत. यामध्ये जुने फर्निचर,  कटलरी,  जुन्या वस्तू पाहण्यात येतील.  ह्या घरामध्ये एक बंकर सुद्धा आहे.  ह्या घरासोबतच अनेक जुनी कौलारू घरे पाहण्यासारखी आहेत.

५) मापसा मार्केट:- ( Mapusa market)

हे एक खूप जुने मार्केट आहे.  हे मार्केट बागा किंवा कलंगुट ह्या बीचच्या जवळ आहे.  येथे अनेक वस्तू स्वस्त दरात मिळतात.  तुम्ही येथे निवांत भटकंती करू शकता.  येथे फळांचे होलसेल मार्केट सुद्धा आहे.  येथे कपडे, सुकवलेले मासे,  विविध कोकणी फळे,  शोभेच्या वस्तू,  घरगुती साहित्य,  चपला,  शोभेचे दाग दागिने यांची वाजवीपेक्षा कमी दरात खरेदी करू शकता.  हे मार्केट पूर्ण फिरण्यासाठी किमान तीन ते चार तासाचा कालावधी लागतो.

६) तांबडी सुर्ला मंदिर:- ( Tambdi surla Temple)

 हे एक खूप सुंदर मंदिर आहे.  पूर्ण दगडी  बांधकामात हे मंदिर घडवलेले आहे.  हे मंदिर भगवान महावीर अभयारण्याच्या कुशीत वसलेले आहे.  हे एक पुरातन महादेव मंदिर असून खूप पाहण्यासारखे आहे.  चहुबाजूनी  वनराईने नटलेल्या परिसरात  हे मंदिर आहे.  या मंदिराला भेट देण्यासाठी ऑक्टोंबर ते जानेवारी हा काळ चांगला आहे.  एकदम शांत आणि निवांत वातावरण अनुभवायचे असेल तर तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट द्या.  येथे प्रॉपर  वॉकवे तयार केलेले आहेत.  येथे जवळच तांबडी सुर्ला धबधबा सुद्धा आहे.  धबधब्याला भेट देण्यासाठी तीन ते चार किलोमीटरचा ट्रेक करावा लागतो.  येथे प्रॉपर नेटवर्क चालत नाही त्यामुळे जाताना थोडी  कॅश सोबत बाळगावी.  या ठिकाणी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शक्यतो पावसात भेट देणे टाळावे

Tambadi surla temple

७)सलीम अली पक्षी अभयारण्य:- (Salim Ali bird sanctuary)

गोव्या मधला हा एक महत्वाचा आणि आकर्षक स्पॉट आहे.  पक्षीप्रेमी साठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि पाहण्यासारखा स्पॉट आहे.  येथे भेट देण्यासाठी पणजी पासून जवळच असणाऱ्या रिबांधर येथे फेरीबोटीसाठी यावे लागते. येथून चोरावा आयलँड च्या फेरीबोटीतून आपल्याला जावे लागते.  तेथे पोचल्यावर आपण चालत चालत सुद्धा आपण सलीम अली बर्ड सेक्चुरीला भेट देऊ शकतो. येथे खूप निरनिराळे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात.  येथे भेट देण्यासाठी सकाळी आठच्या आधी पोहोचावे लागेल कारण त्यानंतर दिसणाऱ्या पक्षांची संख्या कमी होईल.  शक्यतो सुट्टीच्या दिवशी जाणे टाळावे कारण यावेळी खूप गर्दी असते आणि त्यामुळे पक्षी दिसण्याची शक्यता कमी होते.  येथे फिरण्यासाठी प्रॉपर  वॉक वे तयार केलेले आहेत.

८) सालोलीम डॅम:- Salolim dam

हे एक साऊथ गोव्यामधील धरण आहे.  जवळपास 70 ते 80 टक्के लोकांना या धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो.  हे धरण पूर्णपणे हिरव्यागार  वनराईने नटलेल्या जंगलात  असून  पाहण्यासारखे आहे.  येथे जाण्यासाठी तुम्ही बाईक रेंट ने घेऊन जाऊ शकता.  स्वच्छ, समृद्ध असा निसर्ग,  आणि त्यामध्ये असणारा हे प्रेक्षणीय धरण  खूपच नयनरम्य आहे.   ज्यांना फोटो काढण्याची आवड आहे,  त्यांच्यासाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे.  येथे फोटो खूप छान येतात.  ज्यावेळी तुम्ही साउथ गोव्याला भेट द्या त्यावेळी एक वेळ येथे अवश्य जाऊन या.

९)काबो दी रामा फोर्ट:- (Cabo de rama fort)

हा किल्ला पण साउथ गोवा मध्ये येतो.  समुद्रकिनारी असलेला हा किल्ला प्रेक्षणीय आहे.  हा किल्ला गोवा आणि कर्नाटक या राज्याच्या सीमेवर आहे.  सध्या या किल्ल्याची पडझड झालेली असली तरी तरी या किल्ल्यावरून सूर्यास्त पाहणे खूप  नयनरम्य वाटते.  या किल्ल्याला स्वतंत्र असा  बीच सुद्धा आहे. तुमच्या पूर्ण गोवा ट्रिप मध्ये एक तरी सूर्यास्त तुम्ही येथे प्लॅन करू शकता.

अशाप्रकारे वरील सर्व नऊ ठिकाणे प्रेक्षणीय असून जर तुम्ही गोवा फिरायचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणांना अवश्य भेट द्या. आणि आपला अभिप्राय आम्हाला नक्की कळवा.