Village or town? Which one is better (गाव की शहर)

गाव की शहर. आजच्या युवा पिढीपुढे पडलेला गहन प्रश्न. याचे उत्तर मिळवताना अनेक प्रश्नच डोळ्यासमोर आ वासून उभे राहतात. आणि शेवटी एकच उत्तर मिळते ” शहर” तर खेड्यातील मुले शहराकडे का वळतात, त्याचे फायदे आणि तोटे समजून घेण्याचा प्रयत्न आपण आज करणार आहोत. ग्रामीण युवक, शेती, आणि ग्रामीण जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या या विषयावर पुढे बोलूया…

Village Life ( Source – Unsplash )

Why Village youth move to city? ( ग्रामीण युवक शहराकडे का वळतो?)

याचे महत्वाचे कारण म्हणजे तरुण वर्गात शहरापोटी असलेले कमालीचे आकर्षण. शहरी झगमगटाची ओढ असे प्राथमिक कारण देता येईल. त्यानंतर रोजगाराच्या संधी chya शोधात तरुण वर्ग शहराकडे जातो आणि काही मुले शिक्षणासाठी शहराची वाट धरतात. आपली प्राप्त परिस्थिती बदलणे, यशस्वी जीवन जगणे, काही करूंन दाखवण्याची जिद्द युवकांना स्वस्थ बसू देत नाही. मग यामध्ये बरेच जण फसतात. काही यशस्वी ही होतात. काहींची धडपड चालू असते. एक यशस्वी जीवन जगणे याच महत्व कक्षेतून शहरे भरायला लागली आणि गावेच्या गावे ओस पडायला लागली आहेत.

दुसरा महत्वाचा भाग म्हणजे लाईफ स्टाईल. जी लाईफ शहरात आहे ती गावात नाही. एखादा सधन व्यावसायिक किंवा शेतकरी जरी गावात राहत असला तरी, अरे तू गावी राहतो का हा विचारला जाणारा प्रश्न…वाढती बेरोजगारी, मुलांच्या लग्नाच्या वाढत्या समस्या अशी ही काही कारणे आपल्याला सांगता येतील. 

शहरात १०-१० च्या खोलीत आजची युवा पिढी राहत आहे. स्पर्धा परीक्षा ही शहरात क्लास लावला तरच पास करता येते हा एक भ्रम शहराकडे गर्दी खेचत आहे. १०-१५ हजार रुपयांसाठी ३०-४० % युवक राब राब राबत आहेत. तसे पाहिले तर गाव आणि गावाकडचे जीवन निवांत आणि निरोगी. माणसांची साथ सोबत जशी गावी भेटते तशी शहरात भेटणे कठीण . आपल्या सोबत असणारे आपले आईवडील, कुटुंब यांच्या सानिध्यात गावात राहू शकतो. पर्यावरण समृध्द आणि समतोल साधत गावात राहणे कधीही उत्तमच. काही अपवाद सोडले तर शहरात राहणारी मुले ही अपयाशी ठरतात. पण गावी परत येऊन मानहानी होण्यापेक्षा आहे तिथंच बरे आहे याचा विचार करून ते शहराचा एक अविभाज्य भाग बनतात. सिनेमा, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वर दाखवल्या जाणाऱ्या, भुरळ घालणाऱ्या शहरातील गोष्टी पाहून त्या मागे धावणारी आजची युवा पिढी डबाक्यातले बेडूक बनून राहिले आहेत. त्या पलीकडे जाऊन संधी शोधायला प्रयत्न केला तर नक्की यशस्वी होता येईल.

Can there be a more opportunities in the village than in the city? (शहरापेक्षा जास्त संधी गावात मिळू शकतात का?)

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्था वर आधारित आहे. ग्रामीण समाजजीवनाचा आधारस्तंभ म्हणून शेतीकडे पाहिले जाते. या शेतीवर आधारित अनेक संधी आज आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्या संधींचा योग्य प्रकारे उपयोग आजचा युवा करून घेताना दिसत नाही. जर एखादा स्टार्ट उप गावी करायचा असेल तर सद्या करायला काहीच अडचण नाही. कारण ज्या महत्त्वाच्या सोयी सुविधा लागतात त्या हल्ली गावात सहज मिळून जातात. इंटरनेट महत्वाचं काम करत आणि आता गावाकडे सुद्धा ५ जी नेटवर्क सहज चालत. प्रशिक्षित किंवा तुल्य मनुष्यबळ गावी उपलब्ध आहे. शिवाय शहरामध्ये जे खर्चाचे प्रमाण आहे त्या पेक्षा कमी खर्च गावातील गुंतवणुकीत येतो. कॉस्ट इफेक्टिव्ह संकलपणा गावात चांगली राबवली जाऊ शकते. 

ऍपल, अमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा एखाद्या गॅरेज मधून सुरुवात होऊनच मोठ्या झाल्या याचे भान बऱ्याच लोकांना नाही. सुरुवात महत्वाची आहे. आज दळण वळण खूप गतिशिल झाले आहे. छोटी मोठी खेडी आज मोठ्या शहरांशी जोडली गेली आहेत. त्यामुळे एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करणे एकदम सोपे आहे. आज प्रत्येक गावातील ६०-७०% मुले ही नोकरी आणि शिक्षण यानिमित्त शहरात आहेत. त्यातील ५-१०% मुलांनी जरी गावी व्यवसाय टाकला आणि कष्ट करण्याची जबाबदारी घेतली तर ते नक्कीच यशस्वी होऊ शकतात. शहरात असणारी कॉल सेंटर गावामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकतात. गावाकडे आयटी इंजिनियर भरमसाठ आहेत. अशा आयटी इंजिनिअर नी गावीच कंपन्या टाकल्या तरीही तेथील मुलांचा फायदा होईल. 

त्याचबरोबर शेती आणि त्यावर आधारित व्यवसाय यातून सुद्धा आर्थिक प्रगती करता येते. नवीन तंत्रज्ञान वापरून प्रगतशील शेती केली जाऊ शकते. बरेचसे शेतकरी फक्त पारंपरिक पिके घेताना दिसतात. याउलट थोडा वेगळा विचार करून परदेशात मागणी असलेला माल उत्पादित केला तर फायदा होऊ शकतो. जरबेरा शेती, ड्रॅगन फ्रूट, अंजीर, चेरी यासारखी उत्पादने घेता येऊ शकतात. 

शेतीवर आधारित कोल्ड स्टओरएज सारख्या संकल्पना राबवता येतील. स्विटकॉर्न, बेबी कॉर्न, पावटा, ग्रीन पिज सारखी उत्पादने सोलून, पॅकिंग करून ट्रान्सपोर्ट करता येतील. यामध्ये रोजगार निर्मिती होते. त्याचबरोबर शहरी भागात आढळणारी मॉल संस्कृती खेड्यामध्ये राबवता येईल. जर one stop solution गावी भेटायला लागले तर गावातील लोक नक्कीच आकर्षित होतील. व्यवसायावर आधारित व्यवसाय अशी जर ecosystem गावात निर्माण करता आली तर नक्कीच शहरापेक्षा जास्त संधी गावात निर्माण झालेल्या बघायला मिळतील.

City (Source – Unsplash )

Is there an advantage to starting a business in a village or not? (गावामध्ये व्यवसाय सुरू करण्याचा फायदा आहे की नाही?)

व्यवसाय म्हणजे चांगली मोठी जागा, त्यासाठी मोठी बाजारपेठ आणि भरमसाठ investment असच बऱ्याच लोकांचं मत आहे. काही अंशी ते बरोबर जरी असलं तरी गावी व्यवसाय सुरू करण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये तुम्हाला वेळेचं बंधन नाहीय. जेव्हा हवं तेव्हा तुम्ही स्वतःसाठी काम करू शकता. आपली हक्काची माणसं, आपलं कुटुंब यामध्ये सदैव तुमच्या सोबत असतं. तुम्ही कुठ कमी पडतात तिथं हीच तुमची हक्काची माणसं साथ देतील. एक चांगली सपोर्ट सिस्टिम तुम्हाला गावातच भेटेल. त्यामुळे तुम्ही आत्मविश्वास पूर्वक तुमच्या व्यवसायावर लक्ष्य केंद्रित करू शकता. 

Agrarian based economy and its neglect ( शेतीवर आधारित इकॉनॉमी आणि त्याकडे होणारे दुर्लक्ष)

सद्या यशस्वी होण्यासाठी शहर गाठलं पाहिजे हाच एक ध्यास घेऊन मुल आपली मूळ गाव आणि आपल्या मातीशी असलेली आपली नाळ तोडू पाहत आहेत. ही मातीच आपली प्रगती करू शकते याचे भान राहिलेले नाही. शहरात वाढणारी लोकसंख्या आणि गावात पडीक पडणारी जमीन या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतीवर आधारित एक मोठी अर्थव्यवस्था उदयास येऊ शकते. सरकारी धोरण आणि तरुण वर्गात शेती पायी असणारी अनास्था बदलली गेली पाहिजे. जग झपाट्याने बदलत आहे आणि लोक पारंपरिक शेतीची कास सोडायला धजत नाहीत. गावाकडे माती परीक्षण काही क्वचित लोक करून घेतात. आपल्या जमिनीचे आरोग्य कसे आहे हे ९०% लोकांना माहीत नाहीय. आपल्या जमिनीत आपण चांगलं काय पिकवू शकतो याची माहितीच नसल्याने एकदम कमी फायद्याची पिके आपण वारंवार घेत राहतो. जोपर्यंत गावातले युवक शेतीला व्यवसाय म्हणून बघणार नाहीत तोपर्यंत पर्याय उपलब्ध होणार नाही. ग्रुप शेती करून तुम्ही एकाच पीक घेऊन ते ट्रान्सपोर्ट करू शकता. किंवा अशा शेतकऱ्यांना डायरेक्ट व्यापारी संपर्क करून जागेवरून माल खरेदी करून घेऊन जातात. एकप्रतीचा चांगला शेती माल एकत्र भेटत असेल तर व्यापारी संपूर्ण माल खरेदी करतात. यामध्ये बाजारपेठ शोधणे, आपला माल बाजारपेठेत नेवून विकणे यातला वेळ वाया जात नाही. यासाठी लागणारा खर्च वाचतो आणि परिणामी जास्त फायदा घेता येतो. 

Organic sheti हा एक चांगला पर्याय आहे. आजच्या भेसळ युक्त खाद्य पदार्थ मध्ये आपल्या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या पदार्थांची वानवा भासते. ऑरगॅनिक फूड खाणारा एक वेगळा आणि मोठा ग्रुप सद्या अस्तित्वात आहे. या तुलनेत त्यांना पुरवला जाणारा माल खूप कमी आहे. जर त्या दृष्टीने प्रयत्न केले तर हमखास यश मिळू शकते. ऑरगॅनिक शेतीमध्ये खर्च कमी आणि जास्त उत्पन्नाची हमी आहे. 

शेत तळी निर्माण करून त्यामध्ये मासे पालन , खेकडा पालन करता येते. शेत तळी तयार करायला किंवा त्यावर आधारित व्यवसाय करायला सरकार अनुदान देते त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. शेत तळी सुद्धा ग्रुप बनवून करता येतात. त्यामध्ये मत्स्य पालन करून ते विविध बाजारपेठेत पोचविण्याचे काम करता येते. मासे पकडणे, त्याची वर्गवारी करणे यासाठी लागणारे मनुष्य बळ गावी सहज उपलब्ध होते. यामुळे स्थानिक लोकांना रोजगार ही मिळतो. शिवाय मासे पालनासाठी लागणारे साहित्य, खाद्य यावर आधारित व्यवसाय आणि त्याची साखळी तयार करता येऊ शकते.

What do the youth have to do to live in the village? (गावात राहण्यासाठी युवकांना काय करावे लागेल?)

सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या इच्छा आणि आकांक्षा, आपले ज्ञान, आपले शिक्षण याची योग्य गुंतवणूक गावी कशी करता येईल याचा विचार केला पाहिजे. गावातीलच अशी खूप मुले किंवा मुली आहेत ज्या बाहेर मोठ्या सिटी मध्ये २५ लाखपासून १ करोड पर्यंत पॅकेज घेतात. अशा मुलांनी त्यांच्या शिक्षणाचा योग्य वापर गावी होईल का यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. गावातील रोजगार कसे वाढवता येतील, गावातील अर्थव्यवस्था कशी भक्कम करता येईल याचा विचार विनिमय केला पाहिजे. आपल्याला भेटणारा अमूल्य वेळ वाया न घालवता आपले गाव हेच आपल्यासाठी शहर आहे असे समजून, पूर्ण झोकून देऊन, प्रामाणिक कष्ट करून शेती, शेतीवर आधारित व्यवसाय, कॉर्पोरेट कंपनी यासारख्या क्षेत्रात लक्ष्य द्यायला सुरुवात केल्यास एक भक्कम अशी व्यवस्था गावात निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. शहर जरी हवं हवेसा वाटत असला तरी निरोगी  जीवनशैली ही गावातच अनुभवायला मिळणार आहे त्यामुळं गड्या शेवटी आपला गावच बरा…..